आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा आरक्षण : प्रतिज्ञापत्रासाठी राज्य सरकारला ६ अाठवडे मुदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठा आरक्षणासंबंधी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला सहा आठवड्यांची मुदत दिली. शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यांत मराठा समाजासाठी राखीव जागांचे राज्य सरकारने समर्थन केलेे. त्यामुळे हा आरक्षणाचा निर्णय कायदेशीर कसोटीवर कसा योग्य आहे, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारला सादर करावे लागेल.
न्या. अनुप मोहता आणि न्या.जी. एस. कुलकर्णी यांनी गुरुवारी सर्व हस्तक्षेप याचिकाकर्ते आणि प्रतिवादींना पुढील दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्रे सादर करण्यास सांगितलेे. ती दाखल झाल्यावर चार आठवड्यांत सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...