आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराेधकांच्या लढ्याला यश : प्रकाश मेहता मंत्रिपद साेडणार, मुख्यमंत्र्यांवर साेपवला निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईच्या ताडदेवमधील एम.पी. मिल कंपाउंड येथील एसआरए प्रकल्पात बिल्डरला नियमबाह्य भूखंड दिल्याचा अाराेप असलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी अखेर राजीनामा देण्याची तयारी दर्शवली अाहे. मुख्यमंत्र्यांनी अादेश दिल्यास माझ्यावरील अाराेपांची चाैकशी हाेईपर्यंत अापण मंत्रिपद साेडण्यास तयार असल्याचे त्यांनी शुक्रवारी जाहीर केले.
 
मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून मेहता यांनी हा निर्णय घेतला हाेता. त्यामुळे मेहतांची पाठराखण करणारे देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मात्र या विषयावर माैन बाळगून हाेते. दरम्यान, भाजपचे केंद्रीय नेते मेहतांवरील अाराेपांची चाैकशी करणार असून त्यानंतरच राजीनाम्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. विधिमंडळाच्या अधिवेशनात मेहतांच्या राजीनाम्यासाठी विराेधकांनी अाक्रमक पवित्रा घेतला अाहे. मेहतांना हटवल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, असा इशारा देत शुक्रवारी विधान परिषदेत गदाराेळ घालत तब्बल अाठ वेळा कामकाज बंद पाडले हाेते. विराेधकांचा दबाव वाढत असल्यामुळे तसेच ‘पारदर्शी कारभारा’चा दावा करणाऱ्या फडणवीस सरकारच्या प्रतिमेला तडा जात असल्यामुळे पक्षश्रेष्ठींच्या अादेशावरून मेहतांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. त्यांना पदावरून पायउतार करण्यापेक्षा भाेसरी भूखंडप्रकरणी एकनाथ खडसेंनी ज्याप्रमाणे स्वत:हून राजीनामा दिला, त्याचप्रमाणे मेहतांनाही निर्णय घेण्यास भाजपकडून भाग पाडले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी मेहतांना वाचवण्यासाठी गेल्या चार दिवसांत आटोकाट प्रयत्न केले. ‘एमएसअारडीए’चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम माेपलवार यांना पदच्युत करून विराेधकांचे समाधान करण्याचा प्रयत्नही केला. 
 
पुराेहित, सागर, लोढा यांना मंत्रिपदाचे वेध 
प्रकाश मेहता हे गुजराती समाजाचे. मुंबईतील भाजपच्या या ‘व्हाेट बँकेवर’ त्यांचा प्रभावही अाहे. मेहतांनी राजीनामा दिल्यास याच समाजातील अन्य अामदाराला मंत्रिपदाची संधी मिळू शकते. राज पुराेहित, याेगेश सागर व मंगलप्रभात लाेढा यांची नावे चर्चेत अाहेत.
 
‘पक्षाकडे भूमिका मांडणार’ 
मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडून स्पष्टीकरण मागितले नाही. ते निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. मुख्यमंत्री घेतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल. पक्षाकडे योग्य वेळी माझी भूमिका स्पष्ट करीन.’  
- प्रकाश मेहता, गृहनिर्माणमंत्री
 
पुढील स्लाइडवर वाचा, मुख्यमंत्र्यांचे दावे फाेल...  
 
हे ही वाचा, 
बातम्या आणखी आहेत...