आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदू मिलचे भूमिपूजन आता ११ ऑक्टोबरला, पंतप्रधानांना वेळ नाही का? : काँग्रेसचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- इंदू मिलमधील जागेत प्रस्तावित असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन आता ११ आॉक्टोबर रोजी होणार आहे. यापूर्वी ४ ऑ क्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते होणार होते.

काँग्रेसने मात्र या निर्णयावर टीका करत स्मारकाच्या भूमिपूजनापेक्षा पंतप्रधानांना अाणखी कोणते महत्त्वाचे काम आहे, ज्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केला. तर ‘इंदू मिलची (एनटीसी) जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रियाच अजून पूर्ण झालेली नाही, त्यामुळे सरकार भूमिपूजनास विलंब करत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला.

दुसरीकडे, आजवर या कार्यक्रमाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात अालेली नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. ‘माध्यमांनीच ४ ऑक्टोबरला हा कार्यक्रम ठरल्याच्या बातम्या दिल्या. ११ ऑक्टोबर ही तारीखही सरकारने जाहीर केलेली नाही. पंतप्रधानांच्या दौऱ्याची अधिकृत संमती मिळताच लवकरच राज्य सरकारच्या वतीने कार्यक्रमाची तारीख जाहीर केली जाईल,’ असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहे.