आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यो गांच्या परवानगींची संख्या कमी करा : मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- "मेक इन महाराष्ट्र' अभियान अधिक गतिमान करण्यासह राज्यात उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या आणखी कमी करण्याच्या तसेच उद्योजकांना ऑनलाईन सेवा जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विशेष आढावा बैठकीत दिल्या.
उद्योगमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. उद्योग प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांनी ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’ अंतर्गत विविध विभागांशी संबंधित कमी करण्यात आलेल्या परवानग्यांची संख्या आणि ऑनलाईन सेवांबाबत सादरीकरण केले. यापुढील टप्प्यात ही संख्या कमी करण्यासाठी असलेल्या पर्यायांचीही त्यांनी दिली. मुख्यमंत्री म्हणाले, उद्योग उभारणीसंदर्भातील अटी व नियम शिथिल करणे आवश्यक असणाऱ्या विभागांनी प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणावेत.