आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएल लिलाव २० फेब्रुवारीला बंगळुरूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अाता दहाव्या सत्रातील इंडियन प्रीमियर लीग (अायपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव येत्या २० फेब्रुवारीला बंगळुरू येथील रिट्झे कार्लटन हॉटेलमध्ये होईल. या लिलावासाठी सुमारे ७५० खेळाडूंच्या नावाची नोंद झाली असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या ८ संघांना प्रत्येकी २७ खेळाडूच घेता येतील. त्यामध्ये ९ परदेशी खेळाडूंची संख्या मर्यादित असेल. ७६ खेळाडूंचा लिलाव होईल व त्यापैकी २८ खेळाडू परदेशी क्रिकेटपटू असतील. प्रत्येक संघाला खेळाडू घेताना खर्च करावयाच्या रकमेवरही मर्यादा आहेत.

अायपीएलमधून पीटरसन बाहेर
इंग्लंडचा स्टार फलंदाज केविन पीटरसन हा अागामी दहाव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग (अायपीएल) टी-२० क्रिकेट स्पर्धेतून बाहेर झाला अाहे. त्यामुळे त्याने लिलाव प्रक्रियेमधून नाव परत घेतले अाहे. याची माहिती त्याने नुकतीच ट्विटरवरून दिली.
बातम्या आणखी आहेत...