आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतून आयएसआय एजंटला अटक, पाकच्या गुप्तहेर संस्थेला पैसे घेऊन देत होता माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई/ लखनऊ - महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएसने संयुक्त मोहिमेत आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संस्थेचा एजंट जावेदला अटक केली. २४ तासांतील ही तिसरी अटक आहे. तिघांवरही लष्कराशी संबंधित माहिती फोडल्याचा आरोप आहे. दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात पकडलेल्या हेरगिरीच्या नेटवर्कशी त्यांचा संबंध असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
बुधवारी उत्तर प्रदेश एटीएसने फैजाबादेतून आयएसआयचा एजंट आफताब अलीला अटक केली होती. त्याच्या काही तासांनंतर त्याचा साथीदार अल्ताफ कुरेशीला मुंबईतून अटक करण्यात आली होती. या दोघांना पैसा पुरवणारा दलाल जावेदला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसने गुरूवारी अटक केली. जावेदजवळ पाकिस्तानातून पैशाची देवाणघेवाण केल्याचे ठोस पुरावे मिळाले  आहेत. त्याने आयएसआयच्या निर्देशांनुसार आफताबच्या खात्यात पैसे जमा केले होते. त्या रकमेच्या बदल्यात आफताब लष्कराशी संबंधित महत्वाची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवत होता, असे उत्तर प्रदेश एटीएसचे महासंचालक असीम अरूण यांनी सांगितले. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, यूपीत आयएसआय हस्तकाला अटक... 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...