आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसचा अल्पवयीन ‘कमांडर’ सुधारगृहात, बचावासाठी सादर केली दहावीची सनद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेत युवकांची भरती करण्यासाठी काम करणारा, या संघटनेच्या कथित ‘सेकंड कमांडर’ला पाेलिसांनी शनिवारी न्यायालयासमाेर हजर केले. मात्र ताे अल्पवयीन (१६ वर्षे अाठ महिने) असल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलांनी केला. त्यासाठी जन्मतारीख असलेली त्याची दहावीची सनदच सादर केली. त्यामुळे न्यायालयाने या संशयिताची सुधारगृहात रवानगी केली. सरकारी पक्षाने मात्र त्यावर अाक्षेप घेतला. या संशयिताचे नाव व २० वर्षे वय मतदार यादीत असल्याचे न्यायालयास सांगितले. त्यावर पुढील सुनावणीच्या वेळी ८ फेब्रुवारी राेजी दाेन्ही पक्षांनी अाणखी पुरावे सादर करावेत, असे अादेश न्यायालयाने दिले.

मागील अाठवड्यात या संशयिताला उत्तर प्रदेशातील कुशीनगर भागातून एसटीएने अटक केली हाेती. ताे ‘इसिस’मध्ये सेकंड इन कमांडर म्हणून काम करत हाेता. देशातील अनेक तरुणांची दिशाभूल करून देशविघातक मार्गावर नेण्याच्या कारवायात ताे सामील अाहे. देशातील पळून गेलेला अय्याज सुल्तानलाही या संशयितानेच मदत केल्याचा दावा एटीएसच्या वतीने करण्यात अाला. इसिसकडे जाण्याच्या उद्देशाने अय्याज, नूर महंमद व वाजेद शेख हे तिघे मुंबईकर घरातून बेपत्ता झाले हाेते. मात्र कुटुंबीयांची चाैकशी सुरू झाल्याचे कळताच यापैकी नूर व वाजेद परतले तर अय्याज मात्र परदेशात पळून गेला हाेता.

दरम्यान, मागील अाठवड्यात एनअायए व एटीएसने देशभर माेठ्या प्रमाणावर कारवाई करत १४ जणांना अटक केली हाेती. त्यापैकी काेणाकाेणाचा या संशयितांशी संपर्क अाला याचाही तपास एटीएस करत अाहे.