आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंडा सेलमधून बाहेर काढा; जबीचे उपोषण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील अंडा सेलमधून आपल्याला बाहेर काढा, अशी मागणी करत लष्कर- ए तोयबाचा अतिरेकी आणि २६/११ मुंबई हल्ल्यातील सूत्रधार जबिउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याने गुरुवारपासून अन्नत्याग केला आहे. याबाबत पोलिस उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवाशी असलेला जबीच्या दहशतवाविरोधी कारवाया वेरूळजवळ पकडण्यात आलेल्या शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणातून समोर आल्या. नंतर २६/११ च्या हल्ल्यातही त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले. २०१२मध्ये त्याला सौदीतून अटक करण्यात आली होती. सध्या तो आर्थर रोड तुरुंगात बंद आहे. आपल्याला अंडा सेलमध्ये मानसिक तणाव येत असून येथून आपल्याला बाहेर काढावे, अशी मागणी त्यांनी कारागृह प्रशासनाकडे केली अाहे, त्यासाठी उपोषण सुरू केले आहे.
बातम्या आणखी आहेत...