आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावला ‘मेडिकल हब’; वैद्यकीय, अायुर्वेद, हाेमिअाेपॅथी काॅलेज एकाच ठिकाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल (मेडिकल हब) सुरू करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात अाली. या शैक्षणिक संकुलासाठी १२५० काेटी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात अाला. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना प्रगत वैद्यकीय शिक्षण तसेच आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होणार आहेत. 
 
या संकुलामध्ये प्रत्येकी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व  अायुर्वेद महाविद्यालय उभारले जाईल. तसेच ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे दंत महाविद्यालय, ५० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे होमिओपॅथी महाविद्यालय आणि ४० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे भौतिकोपचार महाविद्यालय उभारण्यात येणार अाहे. वैद्यकीय संकुलासाठी १२५० कोटी ६० लाख रुपयांचा निधी आवश्यक असून यामध्ये बांधकामे, वेतन, उपकरणे इत्यादींचा समावेश आहे. संकुलातील महाविद्यालये व रुग्णालयांसाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यात येणार आहे. शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल उभारणीसाठी महसूल विभागामार्फत मौजे चिंचोली शिवारातील ४६.५६ हेक्टर जमीन देण्यात येणार आहे. 
 
१२ एकर जागा मिळणार  
सदर वैद्यकीय संकुल नवीन जागेत स्थलांतरित होईपर्यंत जिल्हा रुग्णालयासह एकूण १२ एकर जागा वैद्यकीय शिक्षण विभागास हस्तांतरित करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली अाहे. या एकात्मिक वैद्यकीय संकुलाच्या उभारणीतून आधुनिक तसेच प्राचीन भारतीय वैद्यकीय चिकित्सा पद्धतीमध्ये आंतरशाखीय संशोधनास चालना मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...