आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता अक्षय कुमारचा 'जॉली एलएलबी’चा तिस-या भागाची तयारी सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता अक्षय कुमारची भूमिका असलेल्या “जॉली एलएलबी-२’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करून हिटचा दर्जा मिळवल्याने निर्मात्यांनी तिसऱ्या भागाची तयारी सुरू केली आहे. 
 
याबाबत फॉक्स स्टार स्टुडिओचे सीईओ विजय सिंग म्हणाले, दुसरा भाग यशस्वी झाल्याने आम्ही तिसऱ्या भागाची तयारी सुरू केली आहे. लवकरच याबाबत दिग्दर्शक सुभाष कपूर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. सुभाष कपूर म्हणाले, अर्शद वारसीला घेऊन आम्ही जॉली एलएलबी केला होता. या चित्रपटाने तेव्हा चांगली कमाई केली होती.  आता अक्षय कुमारला घेऊन आम्ही दुसरा भाग केला.
 
 हा चित्रपट नुकताच शंभर कोटी क्लबमध्ये सहभागी झाला आहे. तिसऱ्या भागामध्ये अभिनेता व अभिनेत्री कोण असतील हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, याबाबत योग्य वेळी माहिती देण्यात येईल. जॉली एलएलबीच्या तिसऱ्या भागाच्या कथेवर लवकरच काम सुरू करण्यात येईल. अक्षय कुमार हा एक अष्टपैलू अभिनेता आहे.
 
कोणतीही भूमिका त्याच्याकडे आल्यास तो तिचे सोने करतो. जॉली  एलएलबीच्या दुसऱ्या भागाचे बहुतांश श्रेय हे अक्षय कुमार याच्याकडे जाते. गेल्या वर्षभरात अक्षयने जवळपास चार  चित्रपट हिट दिले आहेत.  
 
अक्षयचे १३ महिन्यांत चार हिट चित्रपट  
गेल्या काही वर्षांत अक्षय कुमारने  बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. गेल्या १३ महिन्यांत त्याच्या चार चित्रपटांनी शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. नुकताच त्याच्या “जॉली एलएलबीने-२’ या चित्रपटाने या क्लबमध्ये प्रवेश  केला आहे. त्यामुळे त्याच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झाला आहे. 
 
यापूर्वी त्यांच्या ‘एअरलिफ्ट’ (१२८ कोटी ), ‘हाऊसफुल ३’ (१०९ कोटी), ‘रुस्तम’ (१२७ कोटी) या चित्रपटांनी शंभर कोटी क्लबमध्ये सहभाग नोंदवला आहे.
बातम्या आणखी आहेत...