आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशद्रोही कन्हैया रोग्यांची कसली सेवा करणार?, हिंदू संघटनांनी उपस्थित केला प्रश्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘िदल्ली येथील जवाहरलाल नेहरू िवद्यापीठातील डाव्या संघटनेचा नेता कन्हैयाकुमार डाॅक्टर होण्यास िनघाला आहे, मात्र देश तोडण्याची वल्गना करणाऱ्या देशद्रोही कन्हैयाच्या हातून रोग्यांची कसली सेवा होणार आहे?’ असा चमत्कारिक सवाल हिंदू संघटनांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत उपस्थित करत आपली बौद्धिक दिवाळखोरी उघड केली.

या संघटनांच्या अजब सवालानंतर पत्रकारांनी वीर सेनेचे अध्यक्ष निरंजन पाल यांना कन्हैया वैद्यकीयचे िशक्षण घेत नसून तो सामाजिक शास्त्रात पीएच. डी. करत असल्याचे लक्षात आणून िदले. तरीसुद्धा पाल आपल्या िवधानावर ठाम राहिले. ‘पण, कन्हैया एकदा डाॅक्टर झाला की त्याच्याकडे पेशंट तर येणारच, मग त्यांना तो तपासणारच की’, असे स्पष्टीकरण देत राहिले.

कन्हैयाला धमकी
कन्हैयाने मुंबईत येऊन वातावरण बिघडवू नये. त्याने शनिवारी मुंबईत भाषण िदल्यास तसेच नरेंद्र मोदी व संघ यांच्यावर टीका केल्यास तो धडधाकट परत जाऊ शकणार नाही, असा इशारा स्वराज्य हिंदू राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष सुशील ित्रवेदी यांनी दिला.

वरळीऐवजी चेंबूर
आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन या िवद्यार्थी संघटनेने कन्हैया कुमार यांच्या भाषणाचे शनिवारी वरळी येथे आयोजन केले हाेते. पोलिसांनी अचानक गुरुवारी कार्यक्रम स्थळात बदल करण्यास भाग पाडले. त्यामुळे शनिवारचा हा नियाेजित कार्यक्रम चेंबूर येथील टिळक आदर्श िवद्यालयात होणार आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, पुण्यात अायाेजकांनी अद्याप परवानगीच मागितली नाही