आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे सरकार संविधानविराेधी, समविचारींनी एकत्र यावे; संविधान जागर यात्रेत कन्हैयाकुमार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- देशातील मनुवादी सत्ताधारी संविधान संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. हा डाव उधळून टाकून देश वाचवण्यासाठी समविचारी शक्तींनी राजकीय मतभेद दूर ठेवून एकत्र येण्याची गरज आहे, अशी हाक  विद्यार्थी नेता कन्हैयाकुमारने  रविवारी दिली. 


चेंबूर ते चैत्यभूमी या संविधान जागर यात्रेच्या समारोप कार्यक्रमात कन्हैया बोलत होता. डावे पक्ष, भारिप, जनता दल, शेकाप व विविध संंघटनांनी एकत्रितपणे या यात्रेचे आयोजन केले होते. या वेळी कन्हैया म्हणाला, अच्छे दिन हे दिवास्वप्न असून गुजरातची जनता २२ वर्षांपासून त्याची प्रतीक्षा करत आहे. गुजरात मॉडेलचा खरा लाभ अदानी व अंबानींसारख्या उद्योगपतींना झाला असून विकास झाला असेल तर पाटीदार, दलित व शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ का आली, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला. मोदी सरकार संविधानाचे महत्त्व कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आरक्षण समाप्त करून मागास वर्गाला संपवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दहशतवादावर बोलणाऱ्या संघाचा बॉम्ब फोडण्याचा धंदा समोर आला आहे. ज्वलंत मुद्द्यावरून जनतेचे लक्ष दूर करण्यासाठी सरकार पद्धतशीर अजेंडा राबवत आहे. फडणवीस सरकारच्या मी लाभार्थी मोहिमेवरही कन्हैया यांनी टीकास्त्र सोडले.  

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, काय म्‍हणाले प्रकाश आंबेडकर आणि पृथ्वीराज चव्हाण...

बातम्या आणखी आहेत...