आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेणबत्ती मोर्चाने कोपर्डी पीडितेला वाहणार श्रद्धांजली, गेटवेऐवजी दिले इतर तीन पर्याय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो

मुंबई- कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या  घटनेला १३ जुलैला एक वर्ष पूर्ण होत असून तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने मेणबत्ती  मोर्चाचे आयोजन केले आहे.
 
सुरुवातीला गेट वे ऑफ इंडिया वर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र,  या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी झाल्यास मोठी अडचण उद्धभू शकते, असे  पोलिसांनी लक्षात आणून दिल्यानंतर आता हा मोर्चा आझाद मैदानातून िनघून मुंबई महापालिकेसमोरील जवान ज्योतीपर्यंत निघेल.  
 
मुंबईत काही महिन्यांपूर्वी मराठा मोर्चाने  मोटार बाईक रॅली आयोजित केली होती. यात ४ हजार मोटार सायकल्स बाईक रॅलीत सहभागी होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात  बाईक रॅलीत सुमार ४० हजारपेक्षा लोक सहभागी झाले होते. यामुळे ऐनवेळी सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. कँडल मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागण्यास आलेल्या  मराठा मोर्चाच्या आयोजकांना  ही गोष्ट पाेलिसांनी समजावून सांगितली. गेटवेवर एका बाजूला समुद्र असल्याने तेथे मोठ्या संख्येने जमाव जमल्यास सुरक्षेचा प्रश्न येऊ शकतो. आता मेणबत्ती मोर्चाला सुमारे ३ हजार लोक जमतील, असे तुमचे म्हणणे असले तरी शेवटच्या  क्षणी ही संख्या ३० हजारवर जाऊ शकते. अशावेळी सुरक्षेचा मोठा प्रश्न उद्धभू शकतो, असे पोलिसांकडून आयोजकांना  सांगण्यात आले. त्यानंतर माेर्चाच्या आयोजकांनी आपला निर्णय बदलला . 
 
गेटवेऐवजी दिले इतर तीन पर्याय
कोपर्डीतील पीडितेला तिच्या स्मृतीदिनी श्रद्धाजंली वाहण्यासाठी गेटवेऐवजी  शिवाजी पार्क, राणीबाग व आझाद मैदान असे तीन पर्याय देण्यात आले. सीएसटी रेल्वे स्थानकावरून आझाद मैदान जवळ तर आहेच, पण या मोर्चात मोठ्या संख्येने महिला व मुली सहभागी होणार असल्याने सुरक्षतेच्या सर्व शक्यता  लक्षात घेऊन शेवटी मेणबत्ती मोर्चा आझाद मैदान येथे घेण्याचा निर्णय झाल्याची मािहती मराठा मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी या वेळी बोलताना  दिली.
बातम्या आणखी आहेत...