आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिमांनी मराठी भाषेतून अभिव्यक्त व्हावे; कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘महाराष्ट्रातील मुस्लिम मराठी आहेत. त्यामुळे या मुस्लिमांनी मराठी भाषेची कास धरली पाहिजे. मराठीतून जास्तीत जास्त अभिव्यक्त व्हायला हवे. त्यामुळे बहुसंख्याक असलेल्या हिंदुंना मुस्लिम समाजातील व्यथा, वेदना अधिक सुस्पष्टपणे कळतील,’ असे प्रतिपादन कथाकार, कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांनी रविवारी केले.   पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अायाेजित  ११ व्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या समाराेप कार्यक्रमात ते बाेलत हाेते. मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने, समीक्षक डॉ. दादा गोरे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.   

देशमुख म्हणाले की, १९३०-४०च्या दशकात उर्दू-हिंदी भाषेत प्रगतिशील लेखक चळवळ जोरात होती. या पुरोगामी चळवळीतील लेखकांनी गरीब, शोषित-पीडित वर्गाची दु:खे साहित्यातून मांडली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार केला. या प्रगतिशील लेखक चळवळीने केलेल्या कार्याची कास मुस्लिम मराठी साहित्यिकांनी धरली पाहिजे. आपल्या लेखनातून मुस्लिम समाजात परिवर्तन कसे घडेल हे पाहिले पाहिजे,’ असे अावाहनही त्यांनी केले.तत्पूर्वी ‘सोशल मीडिया आणि आजचा तरुण’ विषयावरील परिसंवादात देशमुख व डॉ. शेख इक्बाल यांनी विचार मांडले.
बातम्या आणखी आहेत...