आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लायन’फेम सनी पवारच्या कुटुंबाची रोजगारासाठी वणवण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालकलाकार सनी पवार अापल्या कुटुंबीयांसह. - Divya Marathi
बालकलाकार सनी पवार अापल्या कुटुंबीयांसह.
मुंबई - मुंबईच्या झोपडपट्टीतून थेट आॅस्कर सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आपली छाप उमटवणाऱ्या ‘लायन’फेम सनी पवार या बाल कलाकाराच्या कुटुंबाचा भरपूर गवगवा झाला. कुटुंबाला जगभर प्रसिद्धीही मिळाली; पण चित्रपटाच्या नादात सनीच्या पित्याची कंत्राटी सफाई कामगार म्हणून नोकरी गेली. त्यामुळे पवार कुटुंब सध्या रोजगारासाठी वणवण फिरत अाहे.    

सांताक्रूझच्या कलीना परिसरातील कुचीकाेरवी नगरीत सनीचे कुटुंब दोन झोपडीवजा खोल्यांत राहते. पवार कुटुंब मूळचे सोलापूरचे. सनीचे आजोबा भीमा पवार मुंबई महापालिकेत सफाई कामगार होते. १९९२ मध्ये ते निवृत्त झाले. भीमा यांना दिलीप, अजय आणि रवी असे तीन मुलगे. तिघेही सफाई कामगार आहेत.     
 
लायन चित्रपटाच्या ऑडिशनमध्ये सनीची निवड झाली. त्यानंतर शूटिंग, पुरस्कार, मानसन्मान यासाठी सनीबराेबर त्याच्या वडिलांना जावे लागायचे. त्यामुळे सफाई कामगार असलेल्या सनीच्या वडिलांना नोकरी गमावावी लागली. सनीचे दोन्ही चुलते कंत्राटी सफाई कामगार म्हणून 
काम करतात.   
 
फेब्रुवारीमध्ये सनी आॅस्कर सोहळ्यासाठी कॅलिफोर्नियाला जाऊन आला. मागच्या आठवड्यात त्याला एशिया रायझिंग स्टार पुरस्कार जाहीर झाला. तो पुरस्कार स्वीकारण्यासाठी सनी वडील दिलीप यांच्यासह सध्या लंडनला गेला आहे.   सनीचे आजाेबा भीमा पवार यांनी मुंबई पालिकेत नुकताच अर्ज दिला आहे. माझे तिन्ही मुलगे सफाई ठेकेदारांकडे कंत्राटी कामगार आहेत. त्यांना पालिकेच्या सफाई विभागात सामावून घ्यावे, अशी विनंती त्यांनी महापालिकेच्या प्रशासनाकडे केली आहे.   
 
सनीमुळे प्रसिद्धी मिळाली, पण पैशांची कडकी कायम
लायन या चित्रपटानंतर सनीला ‘लव सोनिया’ चित्रपट मिळाला. अद्याप तो प्रदर्शित झालेला नाही. लायन चित्रपटामुळे आम्हाला प्रसिद्धी मिळाली, पण आर्थिक लाभ विशेष नाही झाला. सनीबरोबर त्याच्या वडिलांना कायम हजर राहावे लागते. त्यामुळे त्याच्या वडिलांची नोकरी गेल्याचे सनीचे आजोबा भीमा पवार यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. 
 
कायमस्वरूपी कामासाठी महापालिकेला साकडे  
लायन चित्रपटाला आॅस्कर नामांकन मिळाले, तेव्हा सनी चर्चेत होता. त्याचे जंगी स्वागत झाले. ‘मातोश्री’पासून ‘वर्षा’पर्यंत पायघड्या अंथरण्यात आल्या. पण, सनीच्या कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न मात्र तसाच राहिला.       
- कुटुंबाला सनीच्या कामाचा अभिमान आहेच; पण दुसरीकडे रोजीरोटीचा प्रश्नही भेडसावतो आहे. त्यामुळे सनीचे सत्तर वर्षांचे आजोबा आपल्या मुलांना पालिकेने कायमस्वरूपी सफाई कर्मचारी म्हणून कामास घ्यावे, यासाठी जाेडे झिजवत आहेत.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...