आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी फेसबुकवर लाइव्ह आत्महत्या रोखली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे फेसबुकवर लाइव्ह आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे प्राण वाचले. मुंबईच्या शिवडी भागात ३२ वर्षीय प्रियंका जेठालाल मारू या महिला वकिलाने बांधकाम सुरू असलेल्या १८ मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याची योजना आखली. त्याचे तिने फेसबुकवर लाइव्ह प्रक्षेपणही सुरू केले. इमारतीच्या जवळच राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून तिच्या संशयास्पद हालचालींची माहिती दिली.
 
पोलिसांचे एक पथक तत्परतेने इमारतीत दाखल झाले. त्यांनी आत्महत्येपासून परावृत्त केले. तिला ताब्यात घेतल्यानंतर परळमधील एका रुग्णालयात उपचारांसाठी तिला दाखल केले. गेल्या महिन्यात वांद्र्यातील एका हाॅटेलच्या १९ व्या मजल्यावरून २३ वर्षीय विद्यार्थ्यांने आत्महत्या केली होती.
बातम्या आणखी आहेत...