आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाडच्‍या सावित्रीमधील मासे लोक घेईना, माशांमध्‍ये माणसांचे अवशेष सापडल्‍याच्‍या अफवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायगड- महाड दुर्घटना घडलेल्‍या सावित्री नदीतून पकडलेल्‍या माशांना स्‍थानिक लोक खरेदी करत नसल्‍याचे आता समोर आले आहे; महाड तालुक्यातील आदिवासी मच्छीमारांनी याबाबत तक्रार करत तहसीलदारांना पत्र लिहून मध्यस्थी करावी अशी मागणी केली आहे. महाडच्‍या दुर्घटनेमुळे हा प्रकार घडला असावा अशी माहिती समोर येत आहे.
- गेल्‍या महिन्यात महाडमधील सावित्री नदीवरील जुना पूल कोसळला.
- या दुर्घटनेत दोन एसटी बससोबत अनेक गाड्या वाहून गेल्या होत्या.
- यामध्‍ये सुमारे 42 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
- शोधकार्यात आतापर्यंत 27 मृतदेह सापडले आहेत.
- इतर मृतदेह सापडले नसल्‍याने नदीतील मासे खाणे अपशकुनी असल्‍याचे लोक मानत आहेत.
- त्‍यामुळे स्थानिकांनी माशांची खरेदी करणे बंद केले आहे.
माशांच्‍या पोटात बुडालेल्‍यांचे अवशेष सापडल्‍याच्‍या अफवा...
सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सुमारे 42 प्रवासी वाहून गेले होते. या नदीतील बहुतेक मृतदेह सापडले नाहीत. त्‍यामुळे माशांच्या पोटात बुडालेल्‍या लोकांच्‍या हाताचे आणि डोळ्याचे अवशेष सापडल्याची अफवाही पसरल्याने सावित्री नदीतील मासे खाणे स्थानिक अपशकुनी समजत आहेत. स्थानिकांनी आदिवासी मच्छीमारांकडून मासे खरेदी करणेही सोडून दिले आहे. त्‍यामुळे आता मच्छीमार चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, आजही धडकी भरवतात हे 10 फोटो...
बातम्या आणखी आहेत...