आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MH Budget 2016 : आरोग्‍यासाठी १५५४ कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात सार्वजनिक आरोग्य विभागासाठी १ हजार ५५४ कोटी इतका निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. यापैकी राष्ट्रीय आरोग्य अभियानसाठी ९७० कोटी देण्यात येणार असून शहरी व ग्रामीण भागातील आरोग्यसेवांच्या बांधकामांसाठी २३३ कोटी, ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर सर्व शिक्षण अभियानासाठी ७४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना मदतीचा हात देताना या योजनेत समावेश असलेल्या आजारांच्या यादीत सुधारणा करण्यात आली. नवीन आजार तसेच उपचारांचा यात समावेश आहे. सन २०१६-१७ वर्षात या योजनेसाठी ३०० कोटी देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी जाहीर केले.

महिलांसाठी ३०० तेजस्विनी बसेस
या अर्थसंकल्पात महिलांचीही काळजी घेण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये नोकरीसाठी किंवा स्वयंरोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर महिलांना दररोज शहर व उपनगरात बसने प्रवास करावा लागतो. बऱ्याच वेळा गर्दीचा सामनाही त्यांना करावा लागतो. रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यांची ही गैरसाय टाळण्यासाठी, या महिलांचा दररोजचा प्रवास सुखकर होण्यासाठी वरील शहरांमध्ये सार्वजनिक बस वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात येणार आहे. केवळ महिलांसाठी या शहरात ३०० तेजस्विनी बसेस शासनातर्फे देण्यात येणार असून त्यासाठी ५० कोटींची तरतूद केली आहे.
शिक्षण विभागासाठी ७४० कोटींची तरतूद
सर्व शिक्षण अभियानासाठी ७४० कोटी, तर संगणक प्रशिक्षणासाठी १८० कोटी निधी देण्यात आला आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाकरिता १३७ कोटी, तर मुलींच्या वसतिगृहाकरिता ५० कोटी निधी प्रस्तावित आहे. राज्यातील ग्रंथालयाचे ई- ग्रंथालयात रूपांतर करण्यासाठी यंदा ४३ ग्रंथालयांची निवड करण्यात आली असून त्यांना प्रत्येकी ४० लाख याप्रमाणे १७ कोटी, २० लाख देण्यात येणार आहेत. ऑ‍लिम्पिककरिता राज्यातील खेळाडूंना तयारी करण्यासाठी ३ कोटी देण्यात येतील, तर उच्च दर्जाच्या सुविधा असलेले विभागीय क्रीडा संकुल मुंबईत बोरिवलीच्या शिंपोली भागात उभारण्यात येणार आहे. याचबरोबर गेली १०० वर्षे खेळांचा प्रचार प्रसार करणाऱ्या अमरावतीच्या हनुमान व्यायामशाळेने शताब्दी वर्षासाठी १ कोटींची मदत दिली जाईल.
हेही वाचा,
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, चंद्रभागा प्रदूषणमुक्तीसाठी २० कोटी,
नागरीकरण, शिक्षण व क्रीडा, आरोग्य अभियान, हरित महाराष्ट्र, बसस्थानके, न्यायालये आणि नाट्य क्षेत्राबाबत....
बातम्या आणखी आहेत...