आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील तुरुंग होणार सुधारगृहे; हार्वर्ड विद्यापीठ देणार प्रशिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- एखाद्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून आरोपीला काही काळ तुरुंगात डांबले जाते. तिथे राहून आपल्या गुन्ह्याचा पश्चात्ताप व्हावा व भविष्यात बंदिशाळेतून बाहेर पडल्यानंतर तरी त्याने चांगले आयुष्य जगावे, या त्यामागील उद्देश असतो. याच उद्देश पूर्ण करण्यासाठी व महाराष्ट्रातील कारागृहे ‘सुधारगृहा’त रूपांतरित करण्यासाठी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.

अमेरिकेतील शिकागोच्या कारागृहात सुमारे ३० टक्के कैदी मनोरुग्ण आहेत. त्यांना या वैफल्यातून बाहेर काढण्यासाठी तेथील कारागृहांना आता सुधारगृहात बदलण्यात आले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही उपाययोजना करण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठ व राज्य सरकार यांच्या संयुक्त माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमांतर्गत पुढील वर्षीपासून कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विद्यापीठाचे तज्ज्ञ प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणात पोलिस अधीक्षक, विशेष पाेलिस महानिरीक्षक या दर्जाचे अधिकारी सहभागी हाेऊ शकतील. अमेरिकन अधिकाऱ्यांचाही त्यात सहभाग असेल.
एक खिडकी योजना
गृह विभागातर्फे ‘बॉम्ब पोलिस अॅक्ट’अंतर्गत विविध व्यवसाय, कार्यक्रमांसाठी दिल्या जाणाऱ्या परवानग्या, परवाने देण्यातही सुलभपणा आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीची कागदपत्रे कमी करून त्यात पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने एक खिडकी योजना सुरू करण्याचाही विचार केला जात असल्याचे गृह विभागाचे प्रधान सचिव विजय सतबीर सिंह यांनी सांगितले. परवानग्या किंवा परवाने काढतेवेळी लोकांचा त्रास कमी व्हावा या उद्देशाने लवकरच ही बदल केले जातील. तसेच कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देत कामकाजात आवश्यक बदल केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.