आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुजबळ अटक प्रकरण : राष्ट्रवादी बॅकफुटवर, मुंबईत तुरळक आंदोलन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बॅकफुटवर गेल्याचे िचत्र िदसून आले. मुंबईतही त्यांच्या अटकेचे पडसाद उमटले नाहीत. मंगळवारी सकाळी विधानसभेच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आमदारांनी निषेधार्थ िनदर्शने केली खरी, पण राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवारच या वेळी अनुपस्थित हाेते. मुंबईत पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही.

भुजबळांना अटक झाल्यानंतर साेमवारी रात्री व मंगळवारी सकाळी िवधान परिषदेचे िवरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका सुरू हाेत्या. यात कार्यकर्त्यांना शांत राहण्याच्या सूचना देण्यात अाल्या. तसेच विधिमंडळाच्या पायऱ्यावर अांदाेलन करून परिषदेचे कामकाज बंद पाडण्याचा िनर्णय घेण्यात आला. त्यानुसार कामकाज बंदही पाडले. विधानसभेत मात्र िवरोधकांिवना सरकारने कामकाज रेटून नेले. या कनिष्ठ सभागृहात राष्ट्रवादीचे नेते व आमदारांमध्ये फारसा जोश िदसला नाही. तीच गोष्ट पायऱ्यांवरील आंदोलनाची. इथेही राष्ट्रवादीचे अामदार फारसे अाक्रमक नव्हते. दादर व वरळीत िनदर्शने झाली, पण त्यात फारसा दम नव्हता. पाेलिसांनी २०० अांदाेलकांना ताब्यात घेतले हाेते. माझगाव हा भुजबळांचा पूर्वीचा बालेिकल्ला. पण, तिथेही अांदाेलनात जाेर जाणवला नाही. अाधीच मुंबईत राष्ट्रवादीची ताकद कमी, त्यात पक्षाला उभारी देणारा नेता नसल्याने मुंबई तशी शांत शांतच होती.
शरद पवारांच्या भूमिकेवर लक्ष
‘हे सूडबुद्धीचे राजकारण’अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. भुजबळांना कायदेशीर पाठबळ देण्याचे सांगताना पवारांनी कार्यकर्त्यांना मात्र काहीच ‘संदेश’ दिला नाही. अजित पवार व तटकरेंवर कारवाई हाेण्याची चिन्हे असल्याने पवारांनी शांततेचा मार्ग अवलंबला असल्याची चर्चा अाहे. माेदींशी असलेले संबंध पाहता भुजबळांवरील कारवाईला तीव्र विराेध न करून पवार अजित पवार व तटकरेंवरील कारवाईला ‘ब्रेक’ मिळवू पाहत असल्याचेही सांगितले जाते.
पक्षाची धार कमी झाली
तेलगी घोटाळा प्रकरणात भुजबळांवर आरोप झाले होते, पण त्यावेळी ते सुटले. आता भुजबळांभोवतीचे फास घट्ट झाले अाहेत. भुजबळ अटकेत असल्यामुळे राष्ट्रवादीकडे विधानसभेत व बाहेर मैदान गाजवणारा असा नेता उरला नाही. अजितदादा, तटकरेंवर चौकशीमुळे मर्यादा आल्या असून आता पक्षाची भिस्त जयंत पाटील व धनंजय मुंडे यांच्यावरच अाहे. मुख्य म्हणजे एकूणच पक्ष बॅकफुटवर असताना शरद पवार काय रणनीती आखतात, याकडे नेत्यांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले असेल. भास्कर जाधव, शशिकांत िशंदे तसेच िजतेंद्र आव्हाड हे आक्रमक भूमिका घेऊन पक्षात ऊर्जा आणू शकतात. पण भुजबळांच्या अटकेनंतर हे नेतेही शांत झालेले दिसतात.
बातम्या आणखी आहेत...