आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीचे ४ हजार कर्मचारी पुन्हा सेवेत, परिवहनमंत्री दिवाकर रावतेंची घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कामावर गैरहजर न राहणे तसेच अन्य काही कारणांमुळे गेल्या काही वर्षांत एसटी महामंडळातील अनेक कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले होते. मात्र, गैरहजेरी किंवा अन्य कारणांनी एखाद्या माणसाचा रोजगार काढून घेणे हे मानवतेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे ४५ वर्षांखालील एसटीच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा .कामावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ४ हजार कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीची संधी िमळणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा परिवहनमंत्री िदवाकर रावते यांनी गुरुवारी विधानसभेत केली. दरम्यान, एसटीच्या कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शनचा लाभ िमळत असून अटल पेन्शनचाही लाभ त्यांना देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
सुनील प्रभू व आशिष शेलार यांनी २९३ अन्वये मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना रावतेंनी ही घोषणा केली. मराठी भाषा येणाऱ्या १९ हजार जणांना आॅटोरिक्षा परवाने देण्यात आले आहेत. यापैकी १३ हजार २२२ हे मराठी भाषक भूमिपुत्र आहेत. ४१ हजार परवान्यांसाठी १ लाखांपेक्षा जास्त अर्ज आले होते. यापैकी २९ हजार ८१ जण मुलाखतीस उपस्थित होते. त्यापैकी २६,७७१ जण पात्र ठरले. यापैकी १९ हजार जणांना परवाने िमळाले आहेत. ७,४७७ परवाने प्रलंिबत ठेवण्यात आले असून पात्र ठरूनही एवढ्या संख्येच्या उमेदवारांना मराठी येत नसल्याचे िदसून आले होते, अशी माहितीही रावतेंनी िदली. लवकरच ग्रामीण भागासाठी १ लाख आॅटो परवाने देण्यात येतील यापैकी ५२ टक्के आरक्षित ठेवले अाहेत. ८० टक्के भूमिपुत्रांना हे परवाने देण्यात येतील, तर २० टक्के इतरांना संधी िमळेल. िगरणी कामगार तसेच सीमा आंदोलनात हुतात्मा झालेल्या वारसांना आरक्षणाचा लाभ िमळेल, असे रावते म्हणाले.
हेल्मेट सक्तीमुळे औरंगाबादसह राज्यभरात अपघातांच्या प्रमाणात घट
हेल्मेट सक्ती केल्याने सरकारवर टीका झाली, पण याचा परिणाम राज्यभर खूप िदलासादायक ठरला आहे. औरंगाबादमध्ये तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या शून्यावर आली असून राज्यभर अपघातांचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. चारचाकी गाडी चालवताना सीटबेल्ट लावणे तसेच मोबाइलचा वापर न करणे अनिवार्य करण्याचाही फायदा झाला आहे. मी स्वत: पट्टा लावल्यामुळे जीवघेण्या अपघातामधून वाचलो होतो, असे रावते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...