आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनात 'मराठी बोला चळवळ', ग्रंथप्रदर्शनात मराठी भाषेविषयी जनजागृती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पु.भा.भावे साहित्य नगरी (डोंबिवली) - दरवर्षी आयोजित केले जाणारे साहित्य संमेलन हे मराठी साहित्य आणि एका अर्थाने मराठी भाषेच्या संवर्धनाची एक चळवळ बनले आहे. याच साहित्य संमेलनात यंदा मराठी भाषेसाठी प्रत्यक्ष चळवळ राबवणाऱ्या 'मराठी बोला चळवळ'ने स्टॉल लावलेला आहे. या स्टॉलच्या माध्यमातून मराठी भाषेविषयी जनजागरण करत असल्याचे या चळवळीत काम करणाऱ्यांचे मत आहे.  

गेल्या अनेक वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून मयूर बोडे, प्रसन्न कुलकर्णी, विलास पिसाटे आणि इतर युवक ही मराठी बोला चळवळ राबवत आहेत. महाराष्ट्रात मराठी भाषेला प्रतिष्ठा परत मिळवून देण्याचा उद्देश असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मराठी बोलण्याचा, मराठी पाट्यांचा आग्रह ठेवायला हवा असे त्यांचे मत आहे. त्यासाठी वेळोवेळी या चळवळीच्या माध्यमातून ते विविध ठिकाणी मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी ते प्रयत्न करत असतात. 

मुंबईतील स्थानकांच्या नावासाठी प्रयत्न
मुंबईत काही रेल्वे स्थानकांवरील पाट्यांवर संबंधित स्थळाच्या हिंदी नावातील पाट्या होत्या. या चळवळीतील कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा वारंवार मागोवा घेतला. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. त्यामुळेच पूर्वी बँड्रा असे नाव असलेल्या स्थानकावर वांद्रे नावाच्या तर नेरुळलाही पूर्वी नेरुल असी पाटी असायची ते नेरूळ करुन घेण्याचा आग्रह त्यांनी धरला. मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रभर सोशल मीडियाच्या माध्यमातून या चळवळीचे कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत. त्यांनी अमरावती येथील नया अमरावती ऐवजी नवीन अमरावती अशी पाटी त्यांनी बदलून घेतली. 
 
प्रथमच साहित्य संमेलनात 
साहित्य संमेलनात मराठी भाषेच्या आग्रहासाठी काम करणाऱ्या संस्थेचा स्टॉल असण्याची ही पहिलीच वेळ असावी. आपण करत असलेले काम लोकांपर्यंत पोहोचावे आणि लोकांनीही मराठीचा आग्रह धरावा यासाठी साहित्य संमेलनात स्टॉल लावल्याचे तरुण सांगतात. 
 
हिंदी राष्ट्रभाषा नाही
हिदी ही राष्ट्रभाषा असल्याच्या मुद्द्यावर मराठी बोला चळवळीचे ठाम मत आहे. ही राष्ट्रभाषा नाही असे सांगणारी माहिती त्यांच्या स्टॉलवर आहे. विशेष म्हणजे हे सिद्ध करणारी कायद्याची कलमेही याठिकाणी देण्यात आली आहेत. असे असतानाही आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही. केवळ मराठीसाठी आम्ही आग्रही आहोत, असे चळवळीचे म्हणणे आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, मराठी बोला चळवळीच्या स्टॉलचे काही PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...