आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलन : हे ध्येय काय आहे थांबायाचे बहाणे, यवतमाळचा गझल गायक आबिदची जिद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पु. भावे. साहित्य संमेलन नागरी , डोंबिवली : दुष्काळग्रस्त मराठवाडा, विदर्भातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात नेहमी अशी भावना असते.. 
समजू नकाे ढगा हे साधे सुधे बियाणे
मी पेरले पिलांच्या चाेचीमधले दाणे.. 
अात्महत्या करण्याची वेळ अाली तरी काेणातही संवेदना नाहीत. परंतु या संवेदना यवतमाळ जिल्हयातल्या महागाव तालुक्यातील सवना गावातील अाबीद शेख याच्या काळजाला या संदेदना भिडल्या अाणी त्यातून या गझलची निर्मिती झाली.
 
पदवीधर अाबीदची घरीची परिस्थिती तशी  बेताचीच. वडिलांचे छाेटाखानी दुकान अाणि अाबीदचे दहा बाय दहाचे साधे चप्पलचे दुकान. गावातील लाेकसंख्या जेमतेम सात ते अाठ हजार असल्याने मिळणारे उत्पन्नही तुटपुंजे. शाळेपासून नाटक लिहिण्याची अावड असलेल्या आबीदने अांबेडकर यांच्या जीवनावरील गझल पहिल्यांदा एका मंचावर सादर केली. पण सुरेश भटांनी रचलेली अासवांचे जरी हसे झाले, हे तुला पाहिजे तसे झाले ही गझल भीमराव पांचाळ यांच्या तोंडून ऐकल्यावर मात्र त्याला गझलीच्या दोन ओळींच्या शब्दातही किती सामर्थ्य असते ते कळले. मग त्याने या पद्धतीच्या गझल शिकून घेतल्या. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, हे ध्येय काय आहे थांबायाचे बहाणे ही गझल उमरखेडच्या एका मैफिलीत सादर केली.  त्यावेळी भीमरावांनी आपल्या खांद्यावरची शाल अबिदच्या खांद्यावर घातली. ही माझ्यासाठी मोठी प्रेरणा होती आणि माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यानंतर मी जवळपास ५० गझल केल्या, असे तो म्हणाला. 
 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मला पहिल्यांदाच संधी मिळाली. ज्यांच्यासाठी गझल लिहितो त्यांना ती कळते हे बघून खूप आनंद झाला. दर्दी रासिकामुळेच वन्स मोअर मिळाला आणि मन भारावून गेल्याची भावनाही त्याने व्यक्त केली. खेड्यात न मिळणारी दाद शहरात मिळाली.  नवीन लिहिणाऱ्यांनी ग्रामीण भागात प्रतिसाद मिळत नाही याबद्दल त्याने खंत व्यक्त केली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...