आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव होणार स्वीडनमध्ये, हे 20 चित्रपट दाखवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुनी टॉपडेन. ती मूळ सिक्कीमची, भारतीय चित्रपटांशी, विशेषत: आशयघन चित्रपटांशी नाळ कायम - Divya Marathi
कुनी टॉपडेन. ती मूळ सिक्कीमची, भारतीय चित्रपटांशी, विशेषत: आशयघन चित्रपटांशी नाळ कायम
मुंबई - कुनी टॉपडेन. ती मूळ सिक्कीमची. मात्र, स्वीडनच्या चित्रपट निर्माता-दिग्दर्शकाशी विवाह झाल्याने ती तिथेच स्थायिक झाली. पण तिची भारतीय चित्रपटांशी, विशेषत: आशयघन चित्रपटांशी नाळ कायम राहिली. गेल्या १०-१२ वर्षांपासून मराठी चित्रपटांनी जी भरारी घेतली आहे त्याने कुनीला भारून टाकले. त्यातूनच तिने पुढाकार घेऊन काही संस्थांच्या सहकार्याने स्वीडन येथे २० ते २४ एप्रिल या कालावधीत स्वीडन मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात कासव, एक अलबेला, हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, नटसम्राट २० मराठी चित्रपट दाखवणार आहेत.  

स्वीडन इंडिया फिल्म असोसिएशन, व्हिन्सॅन वर्ल्ड व गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल या संस्थांच्या सहकार्यातून मराठी चित्रपट आता स्वीडनमधील स्टॉकहोममधील चित्रपटगृहांमध्ये तेथील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. मराठी चित्रपट स्वीडनमध्ये झळकण्याचाही हा पहिलाच ऐतिहासिक प्रसंग असणार आहे. कुनी टॉपडेन ही गोव्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी) नियमित हजेरी लावते. साठ वर्षांहून अधिक वयोमान असूनही तिचा उत्साह प्रचंड दांडगा आहे. ‘श्वास’पासून मराठी चित्रपटांनी जी आंतरराष्ट्रीय भरारी घेतली आहे त्याने कुनी अतिशय प्रभावित झाली.  

कुनीने “दिव्य मराठी’ला सांगितले की, गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मराठी चित्रपट तयार होत असून ते स्वीडनमधील लोकांनी बघावेत, या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळावी तसेच स्वीडिश व मराठी चित्रपट उद्योगाने एकत्र येऊन चित्रपट निर्मितीही करावी, असे माझ्या मनात होते. त्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणजे स्वीडनमध्ये आयोजिलेला पहिलावहिला मराठी चित्रपट महोत्सव. त्यात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांमधील नऊ चित्रपट हे महिला सबलीकरण या सूत्रावर आधारित आहेत.   कुनी टॉपडेन व तिचा पती क्रिंस्टर हॉल्मग्रेन या दोघांनी मिळून स्वीडन इंडिया फिल्म असोसिएशनची स्थापना केली. रोमेश शर्मा निर्मित दिल जो भी कहे (फॉलो युवर हार्ट) या बॉलीवूडच्या चित्रपटाचे स्वीडनमध्ये चित्रीकरण झाले ते कुनीच्याच प्रयत्नांमुळे. तिने याआधी स्टॉकहोममध्ये एक हिंदी चित्रपट महोत्सवही आयोजित केला होता. त्याला देव आनंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. स्वीडन व स्कँडेव्हेनियामध्ये हिंदी, मराठी चित्रपटांचे िचत्रीकरण व्हावे म्हणून कुनी प्रयत्नशील आहे. स्वीडन  येथे होणाऱ्या मराठी चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ परेश मोकाशी दिग्दर्शित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाने तर समारोप ‘एक अलबेला’ने होणार आहे.  

‘एक अलबेला’चे दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांनी सांगितले की, युरोपमधील महाराष्ट्र मंडळांनी पुढाकार घेऊन मराठी चित्रपटांचे खासगी खेळ अनेकदा आयोजित केले आहेत. पण ‘एक अलबेला’ असा पहिलावहिला मराठी चित्रपट होता, ज्याचे खेळ युरोपमधील विशेषत: लंडनमधील चित्रपटगृहांमध्ये स्वतंत्रपणे व्यावसायिकरीत्या लावले गेले. ही घटना जून २०१६ ची. त्यानंतर असेच आणखी दोन मराठी चित्रपटांचे खेळही लंडनमध्ये झाले. आता त्याच युरोप खंडामधील स्वीडनमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सव प्रथमच होत आहे हीसुद्धा महत्त्वाची घटना आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा,  हे २० मराठी चित्रपट महोत्सवात दाखवणार...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...