आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंच्या बंगल्यात चाकूसह घुसणारा अटकेत, नाभिक व्यावसायिक असल्याचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस निरीक्षक सुजाता यांनी संशयिताकडून चाकू जप्त केला. त्यांच्या शेजारी आरोपी राममिलन शर्मा. - Divya Marathi
पोलिस निरीक्षक सुजाता यांनी संशयिताकडून चाकू जप्त केला. त्यांच्या शेजारी आरोपी राममिलन शर्मा.
मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थानी चाकूसह घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी शुक्रवारी अटक करण्यात आली. राम मिलन शर्मा असे त्याचे नाव हे. त्याची झडत घेतली असता एक चाकू आणि ब्लेड आढळून आल्याची माहिती खार पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुजाता पाटील यांनी दिली.

दुपारी एकच्या सुमारास कलानगर परिसरातील मातोश्री बंगल्यावर काँग्रेसचे नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्यादरम्यान एक अनोळखी व्यक्ती मुख्य प्रवेशद्वारातून आत घुसत असताना पोलिसांनी त्याला हटकले. चौकशी केल्यानंतर समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून चाकू आणि दोन ब्लेड्स आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावर आपण नाभिक असल्याने या वस्तू आपण बाळगत असल्याचा दावा या व्यक्तीने केला होता. मातोश्री बंगला हा खेरवाडी पोलीसांच्या हद्दीत येत असल्याने त्याला पोलिसांनी अटक केली असून, अधिक चौकशी सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...