आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांच्या पत्नीला नाकारून ठाण्यात महापौरपदी ज्येष्ठ नगरसेविकेला संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापौरपदी मिनाक्षी शिंदे विराजमान झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे. - Divya Marathi
महापौरपदी मिनाक्षी शिंदे विराजमान झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे.
मुंबई - शिवसेनेकडे स्पष्ट बहुमत असलेल्या ठाणे महापालिकेच्या महापाैरपदी मीनाक्षी शिंदे यांची तर उपमहापाैरपदी रमाकांत मढवी यांची साेमवारी बिनविराेध निवड करण्यात अाली. भाजप व  इतर विराेधकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे मतदान न घेताच या दाेघांची निवड जाहीर करण्यात अाली. विशेष म्हणजे शिवसेनेच्या तीन दिग्गज नेत्यांच्या पत्नी निवडून आलेल्या असतानाही, ठाण्याचे महापौरपद मात्र एका सर्वसामान्य कार्यकर्त्या महिलेला देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.
 
नूतन महापाैर मीनाक्षी शिंदे या घोडबंदर भागातून निवडून अालेल्या अाहेत. सलग तीन वेळा नगरसेविकापद, प्रभाग समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष आणि स्थायी समितीच्या सदस्यपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परिषा सरनाईक, खासदार राजन विचारे यांच्या पत्नी आणि आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक या तिघींचे त्यांच्यासमाेर आव्हान होते. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घराणेशाहीला थारा न देता ज्येष्ठ नगरसेविका म्हणून शिंदेंना संधी दिल्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमधून समाधान व्यक्त हाेत अाहे. दरम्यान, नूतन महापाैर- उपमहापाैरांचे अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, युवा सेनेचे अध्यक्ष अादित्य ठाकरे, रश्मी ठाकरे  स्वत: महापालिकेत अाले हाेते. ‘इतर ठिकाणी कोणाचीही हवा असो, पण ठाणेकर अविचलपणे भगव्याच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. ठाण्यात माझा पहिला कार्यक्रम होईल तेव्हा मी ठाणेकरांसमोर नतमस्तक होणार आहे,’ अशा भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या. ठाणेकर मतदारांना धन्यवाद देताना विजयासाठी लढणाऱ्या शिवसैनिकांनाही अापण मानाचा मुजरा करतो,’ असेही ते म्हणाले.   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...