आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएमकडून महाराष्ट्र पक्ष कार्यकारिणी बरखास्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्राची राज्य कार्यकारिणी सोमवारी तत्काळ प्रभावाने बरखास्त करून टाकली. राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकांदरम्यान समितीच्या काही सदस्यांनी निराशाजनक कामगिरी केल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच काही सदस्यांची नावे आर्थिक घोटाळ्यांमध्ये आल्यामुळे ओवेसींनी हा निर्णय घेतल्याचे एमआयएममधील सूत्रांनी सांगितले आहे.

याबाबत ओवेसींनी सर्व सदस्यांना सोमवारी एक पत्र जारी केले असून त्यात तत्काळ प्रभावाने ही समिती बरखास्त करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकांमध्ये एमआयएमने राज्यभरात २६ जागा जिंकल्या आहेत. सोलापूर आणि नांदेडमध्ये पक्षाला चांगले यश मिळाले आहे.  वारिस पठाण व इम्तियाज जलील हे दोन आमदारही पक्षाचे विधानसभेत नेतृत्व करीत आहेत. दरम्यान, ही कार्यकारिणी फक्त निवडणुकांपुरतीच होती, असे आमदार जलील यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...