आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधुमाळी गाजणार: मिनी मंत्रालय, पालिकांचा ‘बिगूल’ अाज वाजणार,

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील दहा महानगरपालिका, २६ जिल्हा परिषदा अाणि २९६ पंचायत समितींच्या निवडणुकांच्या तारखांची घाेषणा राज्य निवडणूक आयोगाकडून साेमवारी सायंकाळी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारएेवजी सेामवारी सकाळीच घेण्याचे नियाेजन केले अाहे.  

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती अाणि सोलापूर या दहा महानगरपािलका, २६ जिल्हा परिषदा त्यांच्या क्षेत्रातील २९६ पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण केली आहे.  सोमवारी सायंकाळी त्यासंदर्भात निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.   राज्यातील या निवडणुकांसाठी चार टप्प्यात १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान मतदान हाेण्याची शक्यता वर्तवली जात अाहे. चारही टप्प्यांचे मतदान पूर्ण झाल्यानंतर सर्वच निवडणुकांची मतमाेजणी एकाच दिवशी हाेऊन निकाल जाहीर केले जातील. अायाेगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला की निवडणुका हाेत असलेल्या क्षेत्रात अाचारसंहिता लागू हाेते. निवडणूक हाेत असलेल्या महापालिका व जिल्हा परिषदांचे क्षेत्र माेठे असल्याने संपूर्ण राज्यभरच अाचारसंहिता लागू हाेईल. त्यामुळे राज्य सरकारला काेणतेही लाेकप्रिय निर्णय घेता येणार नाहीत. त्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून फडणवीस सरकारने दर अाठवड्याला मंगळवारी हाेणारी मंत्रिमंडळ बैठक साेमवारीच सकाळी घेण्याचे नियाेजन केले अाहे. या बैठकीत मुंबई व इतर महापलिका व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला फायदेशीर ठरतील अशा काही लाेकाेपयाेगी निर्णयांची घाेषणा हाेण्याची शक्यता वर्तवली जात अाहे.   

राज्य सरकारने दाेन वर्षांत केलेल्या कामकाजाची लिटमस टेस्ट व नाेटाबंदीवर मतदारांचा काैल कसा मिळताे म्हणूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांकडे पाहिले जाते. 

माेदी सरकारच्या नाेटाबंदीच्या निर्णयामुळे राज्यातील जनतेचे प्रचंड हाल झाल्याचा अाराेप विराेधी पक्षांबराेबरच सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडूनही हाेत अाहे. मात्र नुकत्याच चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत भाजपवर या अाराेपांचा काेणताही परिणाम झालेला दिसत नाही. उलट सर्वाधिक पालिका ताब्यात देऊन नागरी भागातील जनतेने सत्ताधारी पक्षावर विश्वासच दाखवल्याचे मानले जाते. या पार्श्वभूमीवर अाता  मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांत ग्रामीण जनता काेणाच्या बाजूने काैल देते, याबाबत महाराष्ट्राला उत्सुकता अाहे.
 
विदर्भात अकरा नगर परिषदांसाठी ६७ टक्के मतदान, अाज निकाल 
मुंबई - राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या चाैथ्या व अंतिम टप्प्यात ११ नगरपरिषदांसाठी रविवारी सरासरी ६७.३६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज अाहे. राज्य निवडणूक अायाेगाने ही माहिती दिली. यात नागपूर जिल्ह्यातील नऊ व गाेंदिया जिल्ह्यातील दाेन  नगर परिषदांचा समावेश अाहे.  या दाेन्ही जिल्ह्यांतील ५०२ मतदान केंद्रावर सुरळीत मतदान झाले. साेमवारी (ता. ९) सकाळी दहा वाजता मतमाेजणी हाेऊन निकाल जाहीर हाेणार अाहे.

{नागपूर जिल्हा : कामटी- ५९.९२ %,  उमरेड- ७४.८७ %, काटोल- ७०.७५ %, कळमेश्वर- ७५.५९ %, मोहपा- ८५.९६ %, रामटेक- ७०.२० %, नरखेड- ७१.०४ %, खापा- ७४.५२ % व सावनेर- ७३.५६ %. गोंदिया जिल्हा : गोंदिया- ६२.७२ %  तिरोरा- ७३.१५ %.