आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपती व्हायचे तर पवारांनी ‘रालोआ’त यावे : आठवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे  - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवायला इच्छुक असतील तर त्यांनी भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) यावे आणि निवडणूक लढवावी, असा सल्ला पवारांचे ‘जुने मित्र’ आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.  

विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतिपदासाठी पवारांच्या नावाची चर्चा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी हा सल्ला दिला आहे. मात्र आपण या पुढे कोणतीच निवडणूक लढवणार नाही, असे पवारांनी या आधीच स्पष्ट केले आहे. पुढचा राष्ट्रपती कोण असेल? या प्रश्नाच्या उत्तरात आठवले म्हणाले की, त्याचा निर्णय एनडीएच घेईल. मात्र जर शरद पवारांना राष्ट्रपती व्हायचे असेल तर त्यांनी एनडीएत यावे. मराठी माणूस जर राष्ट्रपती होत असेल तर मला आनंदच आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत फक्त एनडीएचाच उमेदवार विजयी होईल. पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चांगले संबंध अाहेत. त्यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत पंतप्रधान व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करावी. एनडीएचे उमेदवार म्हणून ते राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवणार असतील तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मात्र त्यांनी यूपीएचे उमेदवार म्हणून कदापि राष्ट्रपती निवडणूक लढवू नये, असेही आठवले म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...