आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद जिल्ह्यात विकासकामांना निधी तातडीने द्या : रामदास कदम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व विकासात्मक कामे पूर्ण करण्यासंदर्भात उपलब्ध निधीचे तातडीने वितरण करण्याबाबतचे निर्देश राज्याचे पर्यावरणमंत्री तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांनी संबंधित यंत्रणांना गुरुवारी दिले आहेत.  

मंत्रालयात जिल्हा वार्षिक नियोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित कर्मचारी आणि अधिकारी यांना सूचना देताना रामदास कदम यांनी औरंगाबादच्या विकासकामांबाबतचे हे निर्देश दिले.  या बैठकीला औरंगाबादच्या जिल्हाधिकारी निधी पांडे, प्रकल्पांचे संबंधित अधिकारी, महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके आणि गावांमधील रुग्णालये, महिला व बाल रुग्णालये, शासकीय इमारती, व्यवसाय प्रशिक्षण संस्था, मत्स्य व्यवसाय, दलित वस्तीसाठीची विकासात्मक कामे, जिल्हा परिषद शिक्षणाची कामे, विमानतळासमोर पारंपरिक लेण्यांची प्रतिकृती उभारण्यासंदर्भात सुशोभीकरणाची कामे आदींबाबत कदम यांनी या वेळी आढावा घेतला.
बातम्या आणखी आहेत...