आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री सदाभाऊ खाेतांकडून दादरच्या मार्केटमध्ये भाजीपाला विक्रीस मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- शेतकरी प्रश्नासाठी सातत्याने रस्त्यावर उतरणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खाेत कृषी राज्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहत नसल्याचा प्रत्यय मंगळवारी अाला. दादरच्या भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन खोत यांनी तब्बल ३०० गाड्या भाजीपाला व फळे िवकण्यास शेतकऱ्यांना मदत केली. थेट ग्राहक मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती नेहमीपेक्षा २० टक्के जादा पैसे मिळाले.

व्यापाऱ्यांची मनमानी मोडून काढण्यासाठी सरकारने शेतमालाला थेट िवक्री करण्यास परवानगी िदली आहे. या िनर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला असून त्यामुळे ग्राहक व शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेत जाऊन माल विकण्याचे अावाहन केले हाेते. इतकेच नव्हे तर मंगळवारी स्वत: खाेत यांनी दादरच्या मंडईत जाऊन शेतकऱ्यांना भाजी विक्री करण्यास मदत केली. तसेच त्यांना संरक्षण देण्याची ग्वाहीही दिली. जुन्नरचे शेतकरी श्रीराम गाढवे दहा टेम्पो भाजीपाला घेऊन मुंबईत आले होते. त्यांचा भाजीपाला िवकण्यास खोत तसेच पणन िवभागातील अधिकाऱ्यांनी मदत केली. राज्याच्या इतर भागातून अालेले शेतकरी िहंदूराव िशळीमकर, राजेंद्र पवळे, िरंगे शेतकऱ्यांनाही खोत यांनी प्रोत्साहन िदले.
शेतमाल िवक्री एजंटांचीही मदत सरकार घेणार
मुंबईतील भाजी टंचाईवर मात करण्यासाठी थेट शेतमाल िवक्री करण्याचे परवाने देण्यात आलेल्या एजंटाची सरकारततर्फे मदत घेतली जात आहे. मुंबईत माहिम, कांिदवली अाणत्र मुलुंड येथे महापालिकेच्या बाजारात थेट शेतकऱ्यांकडून आलेला शेतमाल िवक्रीला उपलब्ध करून देण्यात आला आहे, असे पणन िवभागाचे सचिव सुनील पोरवाल यांनी सांिगतले. याशिवाय नाशिकमध्येही केवळ डाळिंब िवक्रीसाठी बांधण्यात आलेल्या परफेक्ट मार्केट या बाजारातही भाजीपाला िवक्री सुरू करण्यात आली.
व्यापाऱ्यांनाे, शेतकऱ्यांना वेठीला धरू नका
^व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेठीला धरू नये. िजथे ग्राहक आहेत ितथे भाजीपाल्याच्या गाड्या उभ्या केल्या जातील. शेवटी आम्हाला व्यापाऱ्यांपेक्षा शेतकरी व ग्राहक यांची िचंता आहे. अनेक वर्षे व्यापाऱ्यांच्या हातातच मार्केटची सुत्रे असून बळीराजाच्या मेहनतीची तेच किमंत ठरवत होते. हे आणखी िकती वर्षे चालणार. शेतकरी व ग्राहक यांच्यामधील भिंत तोडण्याचा आम्ही प्रयत्न करत अाहोत. त्यात सुरूवातीला अडथळे येतील, पण आम्ही मागे हटणार नाही.
सदाभाऊ खाेत, कृषी राज्यमंत्री
बातम्या आणखी आहेत...