आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळप परवाना ऑनलाइन15 दिवसांत होईल निर्णय - मंत्री सुभाष देशमुख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - साखर कारखान्यांना उसाचे गाळप करण्यासाठी प्रत्येक वर्षी परवाना घ्यावा लागतो. साखर आयुक्तांकडे अर्ज दिल्यानंतर त्यावरही निर्णय होण्यास विलंब होतो. परिणामी गाळपही लांबू शकते. ही बाब सुकर करण्यासाठी आता ऑनलाइन परवाना देण्याच्या सूचना केल्याची माहिती राज्याचे सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
 
ऑनलाइन परवान्यासाठी अर्ज भरल्यानंतर 15 दिवसांत निर्णय अपेक्षित आहे. मुदतीनंतर परवाना मिळाला, असेच समजण्यात येईल. पावसाळा झाला की, गाळपाची लगबग सुरू होते. कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक कारखान्यांकडे ऊस घालत असतात. कारखाने तांत्रिकदृष्ट्या सज्ज होतात. परंतु गाळप परवान्याविना सारे काही अडून बसतात. त्यासाठी साखर आयुक्त कार्यालयात चकरा घालाव्या लागतात. परवान्याची पद्धत बदलण्याची सूचना अनेक कारखान्यांनी केली होती. त्याची दखल घेऊनच ऑनलाइन पद्धत अवलंबण्याची सूचना केल्याचे सुभाष देशमुख म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...