आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामदार पंकज भुजबळांच्या अटकेला संरक्षण नाही: हायकोर्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनीलाँडरिंग प्रकरणात गुन्हा दाखल असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यांच्या अटकेला आता स्थगिती देता येणार नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. यापूर्वी पंकज यांच्या अटकेला न्यायालयाने अनेकदा स्थगिती दिली होती.
याप्रकरणी न्यायमूर्ती अभय ओक यांच्यासमोर सोमवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालय म्हणाले, या प्रकरणात पंकज यांच्या अटकेला स्थगिती देता येणे शक्य नाही. विशेष मनी लाँडरिंग न्यायालयाने बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंटबाबत पंकज यांनी दाखल अर्जावर जुलै रोजी सुनावणी घेण्यात येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणात छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर सध्या तुरुंगात आहेत. मनी लाँडरिंग प्रकरणात भुजबळ यांच्यासह अकरा आरोपी आहेत. यात राज्यसभा खासदार बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी न्यायालयाने त्यांच्या अटकेला एक जुलैपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...