आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अामदार मेटेंचा नवा पक्ष; सुबोध माेहिते प्रदेशाध्यक्ष, म्हणाले- काँग्रेस दिशाहीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संग्राम परिषद पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अामदार विनायक मेटे यांनी अापल्या नव्या पक्षात माजी केंद्रीय मंत्री सुबाेध माेहिते यांचे स्वागत केले. - Divya Marathi
भारतीय संग्राम परिषद पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अामदार विनायक मेटे यांनी अापल्या नव्या पक्षात माजी केंद्रीय मंत्री सुबाेध माेहिते यांचे स्वागत केले.
मुंबई - शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी सोमवारी आपल्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. भारतीय संग्राम परिषद असे या पक्षाचे नाव असून माजी केंद्रीय मंत्री व शिवसेनेचे माजी खासदार सुबोध माेहिते यांनी या पक्षात प्रवेश केला असून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी साेपवण्यात अाली अाहे. सप्टेंबरमध्येच या पक्षाची नोंदणी झाली अाहे. मेटेंची  शिवसंग्राम ही संघटना यापुढे केवळ सामाजिक कामे करणार.  विशेष म्हणजे यापुढेही आपली संघटना व पक्ष हा सत्ताधारी भाजपसोबत राहणार असल्याचे सांगण्यास मेटे विसरले नाहीत.    

यापूर्वी शिवसंग्राम संघटनेने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती, पण यापुढे नव्या पक्षाच्या  चिन्हावर निवडणूक लढवली जाईल. लोकसभा, विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रिॆगणात पक्ष उतरणार आहे. रामटेक लोकसभा मतदासंघामधून शिवसेनेच्या तिकिटावर दोनदा निवडून गेलेल्या माेहिते यांनी २००७ मध्ये शिवसेनेला रामराम करून काँग्रेसशी घरोबा केला. गेली दहा वर्षे ते काँग्रेससोबत राहिले, पण या पक्षाला काही दिशा नसल्याने अाणि इतर पक्षांमध्ये काम करण्याची काही संधी नसल्याने आपण मेटेंबरोबर येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती माेहिते यांनी दिली. नागपूरमधील काँग्रेस तसेच शिवसेनेमधील अन्य पदाधिकाऱ्यांनीही मेटे यांच्या पक्षात प्रवेश केला.
   
‘भाजपमध्ये जाण्यासाठी सर्वांची शर्यत लागली आहे, पण मेटे हे जमिनीशी घट्ट नाळ असलेले  संघटक असल्याने आपण त्यांच्याबरोबर काम करणार आहोत. आधी काय झाले, याविषयी फार न बोलता मी पुढे काय करणार आहे, ते कामातून सांगणार आहे. गावागावात भारतीय संग्राम परिषदेची शाखा उघडण्याचे माझे लक्ष्य आहे,’ असे माेहिते यांनी सांगितले.    
 
मराठा मोर्चांमध्ये सावळागोंधळ :  मेटे    
मराठा मोर्चांमध्ये सावळागोंधळ आहे. कोणी कोणाला मानत नसल्याची स्थिती आहे. एवढे मोर्चे काढून आपल्या बाजूने काही होत नाही, हे पाहून आता मोर्चात सहभागी होणारे संभ्रमावस्थेत आहेत. याला मोर्चाचे नेते कारणीभूत आहेत, अशी टीका अामदार मेटे यांनी  केली.
 
काँग्रेस दिशाहीन पक्ष : माेहिते  
मी गेली दहा वर्षे काँग्रेसचा उपाध्यक्ष हाेतो. पण या पक्षाला दिशाच नाही. पक्षात कुणी कुणाला मानतच नाही, अशी स्थिती आहे. कार्यकर्ते संभ्रमित झाले आहेत. सर्जिकल स्ट्राइक, नोटाबंदी तसेच गाेमाता संरक्षण या विषयावर लोकशाही पद्धतीने विरोध करणे आवश्यक होते. पण तसे झाले नाहीे असे सुबोध मोहिते म्हणाले.    
 
बातम्या आणखी आहेत...