आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ऐ दिल है मुश्किल' च्या विरोधात मनसेच्या कार्यकर्त्यांचे थिएटरबाहेर आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाकिस्तानी कलाकारांना यापुढे चित्रपटात घेणार नाही, असे सांगून दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही दिग्दर्शक करण जोहरचा “एे दिल है मुश्किल’ चित्रपट प्रदर्शित करू नये, या मागणीसाठी मनसेकडून मुंबईतील मेट्रो चित्रपटगृहाबाहेर बुधवारी आंदोलन करण्यात आले.

पाकिस्तानी कलाकार फवाद खानची भूमिका असल्याने मनसेने या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. बुधवारी मनसे कार्यकर्ते मेट्रो चित्रपटगृहाबाहेर एकत्र आले. या वेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजीला केली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले, आम्ही काही दिवसांपूर्वीच करण जोहर आणि चित्रपटगृह मालकांना चित्रपट प्रदर्शित न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यानंतरही चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्याला मनसे स्टाइलने उत्तर देण्यात येईल, असे ते म्हणाले.

मल्टिप्लेक्समधील कामगारांचा विरोध
मल्टिप्लेक्समध्ये काम करणाऱ्या कामगारांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला आहे. पीव्हीआर, सिनेपोलिस, कार्निव्हलसह इतर चित्रपटगृहांत ७० टक्के कर्मचारी मनसे कामगार संघटनेचे आहेत. मल्टिप्लेक्समधील तंत्रज्ञ, सुरक्षा रक्षक व चतुर्थश्रेणी कर्मचारीही मनसेशी बांधील आहेत. त्यामुळे या संघटनेने संप पुकारला तर चित्रपटगृह मालकांना चित्रपट चालवणे अवघड हाेऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...