आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना‘राज’ नेत्यांची साहेबांच्या दौर्‍याकडे पाठ, मनसेत गटबाजीला उधाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकीकडे पक्षाची मोट बांधत असताना रविवारच्या नाशिक दौर्‍यात त्यांना गटबाजीचे दर्शन घडले. त्यांचे समर्थक आमदार वसंत गिते यांनीच त्यांच्या दौर्‍याकडे पाठ फिरवली.
गितेंच्या प्रकृतीचे कारण पदाधिकार्‍यांनी दिले असले तरी त्यांचे समर्थक नगरसेवक व पदाधिकार्‍यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. महत्त्वाचे म्हणजे, उपस्थितांची ‘हजेरी’च राज यांना सादर झाल्याने नाराजांची ताकदही चाचपण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसले.

मनसेच्या दोन गटांतील धुसफूस नेहमीच चर्चेचा विषय ठरली. लोकसभेतील पराभवानंतर त्यास खतपाणी मिळाले. गितेंकडे असलेली मनसेची सूत्रे निवडणुकीनंतर ती संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकरांकडे गेली. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत गितेंना डावलून आमदार बाळा नांदगावकर व नितीन सरदेसाई यांना चर्चेसाठी पाठवण्यात आले. यामुळे गिते नाराज असल्याचे समजते. दरम्यान, नेते गैरहजर असतानाही राज यांचे मात्र दणक्यात स्वागत झाले.