आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेकडून सूचना मागवून स्मारक उभारणार, उद्धव ठाकरे यांचे अाश्वासन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मारक जागेची घाेषणा केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अाभार मानले. - Divya Marathi
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मारक जागेची घाेषणा केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अाभार मानले.
मुंबई- ‘महापौर बंगल्यातच शिवसेनाप्रमुखांचे स्मारक व्हावे शिवसैनिक व बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या असंख्य लाेकांची इच्छा हाेती. महापौर बंगल्याचे आणि शिवसेनाप्रमुखांचे अतूट नाते आहे. त्यामुळे महापौर बंगल्याची निवड झाली त्याचा आम्हाला आनंद आहे,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. ‘दिव्य मराठी’ने त्यांच्याशी साधलेला संवाद...
अादर्श स्मारक उभारणार
स्मारक कसे असेल यावर आम्ही आता विचार सुरू करणार आहोत. स्मारकात आलेल्यांना शिवसेनाप्रमुखांचे यथार्थ दर्शन व्हावे असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्यांचा संघर्ष, त्यांची दुर्मिळ व्यंग्यचित्रे, त्यांची छायाचित्रे, त्यांची भाषणे जनतेला पाहता, ऐकता यावीत असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. बाळासाहेब जेव्हा फ्री प्रेसमध्ये कार्टून काढत होते ती सर्व व्यंग्यचित्रे माझ्याकडे असून ती या ठिकाणी मांडली जातील. तसेच सर्व वर्तमानपत्रांच्या संपादकांना त्यांच्याकडे बाळासाहेबांबाबत असलेल्या बातम्या, फोटोही आम्ही मागवणार आहोत. तसेच स्मारक कसे असावे याबाबत जनतेकडूनही आम्ही सूचना मागवणार आहोत. या सर्व गोष्टींचा विचार करून एक आदर्श आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आम्ही उभारू, असे उद्धव म्हणाले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, महापैर बंगलाच का... काय म्हणतात विखे पाटील