आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्वतारोहण मोहिमा कधीच विक्रमासाठी केल्या नाहीत, गेरलिंडे काल्टेनब्रुनर यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगभरातील आठ हजार मीटरहून अधिक उंचीची एव्हरेस्टसह चौदा शिखरे कृत्रिम प्राणवायूशिवाय सर करताना कोणत्याही विक्रमाचा  विचार केला नाही. मी पर्वतारोहण मोहिमा कोणत्याही विक्रमासाठी केल्या नाहीत तर ती माझी आवड होती, असे प्रतिपादन ख्यातनाम महिला गिर्यारोहक गेरलिंडे काल्टेनब्रुनर यांनी केले.   
 
मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात नुकत्याच आयोजिलेल्या १६ व्या गिरिमित्र संमेलनामध्ये गेरलिंडे काल्टेनब्रुनर यांची मुलाखत ज्येष्ठ गिर्यारोहक हरीश कपाडिया यांनी घेतली त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी न्यायमूर्ती अभय ओक यांची उपस्थिती होती. गेरलिंडे म्हणाल्या, एव्हरेस्टवर  दरवर्षी अनेक मोहिमा जातात. पण आता या मोहिमांचे व्यापारीकरण झाले आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे. एव्हरेस्टवरील वाढत्या मोहिमांनी तिथे होणाऱ्या कचऱ्याची समस्याही गंभीर बनली आहे. कोणतीही गिर्यारोहण मोहीम करताना निसर्ग व पर्यावरण यांची हानी होऊ नये याची दक्षता गिर्यारोहकांनी घेण्याची आवश्यकता असते. एव्हरेस्टबाबत नेमकी ही दक्षता घेण्याचे प्रमाण घटत चालले आहे. हा प्रश्न निव्वळ एव्हरेस्टपुरताच मर्यादित नाही, तर ज्या ज्या हिमशिखरांवर  आरोहण मोहिमा आयोजिल्या 
जातात तिथे पर्यावरण रक्षणासाठी जास्तीत जास्त काळजी गिर्यारोहकांनी घ्यायला हवी.     
 
चेतना रेमिनन्सेस माहितीपटाला प्रथम पुरस्कार प्रदान
या दोनदिवसीय गिरिमित्र संमेलनात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश व परदेशांतूनही गिर्यारोहक सहभागी झाले होते. या संमेलनाच्या निमित्ताने विविध हिमालय व सह्याद्रीतील गिर्यारोहण मोहिमांवर आधारित माहितीपट स्पर्धा आयोजिण्यात आली होती. त्यातील निसर्गमित्र या संस्थेने तयार केलेल्या चेतना रेमिनन्सेस या सर्वोत्कृष्ट माहितीपटाला प्रथम पुरस्कार देण्यात आला. द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार न्यूमरिकल फोर प्ले या संस्थेने तयार केलेल्या ‘बावलीबूच’ या माहितीपटाला, तर केरळमधील थॉमस जॉर्ज यांनी तयार केलेल्या ‘सांघाली ला’ या माहितीपटाला तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.   
बातम्या आणखी आहेत...