आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आत्मक्लेश\'ची सांगता, राजू शेट्टी आक्रमक; \'...तर मेट्रो शहरांचा दूध-भाजीपाला बंद करु\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भायखळ्यात झालेल्या सभेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राजू शट्टी. - Divya Marathi
भायखळ्यात झालेल्या सभेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राजू शट्टी.
मुंबई - ‘राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांचा सातबारा महिनाभरात कोरा करा, नाहीतर मेट्रो शहरांचा दूध-भाजीपाला तोडू’, असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी फडणवीस सरकारला दिला. पुण्यात त्यांनी काढलेल्या आत्मक्लेश यात्रेची मुख्य सभा मंगळवारी भायखळ्यात पार पडली. या वेळी शेट्टी यांनी मोदी व फडणवीस सरकारच्या कृषीविरोधी धोरणावर टीका केली.   
 
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, असा आरोप करत शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले म्हणून पोलिस त्यांच्या बायका -पोरांना घरातून ओढून नेत आहेत. शेतकऱ्यास तुम्ही काय नक्षलवादी समजता काय?, असा खडा सवाल त्यांनी केला. ‘होऊन जाऊ दे एकदाची निकाली कुस्ती’, या भाषेत शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान िदले. ‘ज्या पाकिस्तानवर तुम्ही सर्जिकल स्ट्राइक केलात, त्याच पाकिस्तानचे कांदे तुम्ही आयात केले. त्यामुळे अामच्या शेतकऱ्यांचे उत्पन्न नाही, कर्ज मात्र दुप्पट झाले. भाजपच्या या पापात मी सुद्धा भागीदार आहे. भाजपला मते द्या, असे सांगत मी दारोदारी भटकलो होतो. त्यातून उतराई होण्यासाठी आज मी आत्मक्लेश करतो आहे’, असे शेट्टी म्हणाले.   
 
मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्यासह इतर नऊ अधिकाऱ्यांची शेकडो एकर जमीन समृद्धी महामार्गालगत आहे. अधिकाऱ्यांच्या जमिनीला सोन्याचा भाव िमळावा म्हणूनच मुंबई ते नागपूर या समृद्धी महामार्गाचा घाट घातला जात आहे. विरोध डावलून हा महामार्ग पुढे रेटल्यास शेतकरी मुंबईचे पाणी तोडतील, अशी धमकी त्यांनी दिली.  शेतकरी संघटनेत फूट पाडण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न असल्याचा त्यांनी आरोप केला.   
सकाळी दहा वाजता परळ येथून आत्मक्लेश यात्रा मार्गस्थ झाली. दुपारी भायखळ्याच्या राणीबागेत जंगी सभा झाली. त्यानंतर यात्रा राजभवनकडे जाऊ लागली. त्याचवेळी पोलिसांनी यात्रा अडवली. त्यानंतर शेट्टी तीस शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह चालत राजभवनवर गेले. त्यांच्यासोबत जनता दल युनायटेडचे आमदार कपिल पाटील होते. बैलगाडीतून सोबत आणलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे अर्ज त्यांनी राज्यपाल  चे. विद्यासागर राव यांना सादर  केले.   
 
२२ मे रोजी पुण्यातील महात्मा जोतिबा फुले यांच्या वाड्यातून आत्मक्लेश यात्रेेस २०० शेतकऱ्यांसह प्रारंभ झाला होता.
 
वेळ पडली तर‘एनडीए’मधून बाहेर पडणार : राजू शेट्टी  
फडणवीस हे संवेदना हरवलेले मुख्यमंत्री आहेत. मात्र  वेळ पडली तर ‘एनडीए’मधून अामची शेतकरी संघटना बाहेर पडेल, असा इशाराही खासदार राजू शेट्टी यांनी िदला. तसेच संघटनेचे नेते व राज्यमंत्री सदाशिव खोत यांचे नाव न घेता ‘मला कुणाचं तोंड बघायची इच्छा नाही’ असा टोला त्यांनी मारला. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी शेट्टी यांनी फडणवीस सरकारला २० जुलैचा अल्टीमेटम िदला. तत्पूर्वी कर्जमाफी न केल्यास शेतकरी संघटना पुन्हा आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी िदला. 
 
हेही वाचा... 
बातम्या आणखी आहेत...