आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिका : 16 जूनला निकाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
मुंबई  - मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेचा प्रमुख आरोपी अबू सालेम आणि मुस्तफा डोसाबद्दल न्यायालय सोमवारी काय निर्णय देते, याकडे देशाचे लक्ष लागले असताना  टाडा कोर्टाने निकाल १६ जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. आरोपींच्या वकिलांनी रमजानचा महिना असल्याने या  महिन्यात निर्णय देऊ नये, अशी मागणी केली मात्र न्यायालयाने  निर्णयासाठी १६ जूनची तारिख  निश्चित केली.   
 
मुंबईत १२  मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात २५७ जण मृत्युमुखी,  तर ७१३ जण जखमी झाले होते. एकूण २७ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. बॉम्बस्फोट घडवण्यासाठी ३ हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते.  या साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपींत अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दिकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कयूम यांचा समावेश आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...