आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सीएसटी’चे नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’; रावतेंची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईतील “एल्फिन्स्टन रोड’ रेल्वेस्थानकाचे नाव “प्रभादेवी’ रेल्वेस्थानक असे करण्यास तर “छत्रपती शिवाजी टर्मिनस’ रेल्वेस्थानकाचे नाव “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असे करण्यास केंद्र शासनाच्या गृह विभागाने मान्यता दिली असून राज्य शासनाने या दोन्ही स्थानकांची सुधारित नावे इंग्रजी व देवनागरी लिपीत राजपत्रात प्रसिद्ध करून त्याप्रमाणे नावांमध्ये बदल करावेत, असे केंद्रीय गृह विभागाने कळवले असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.  

या दोन्ही स्थानकांच्या नावामध्ये बदल व्हावेत ही समस्त मुंबईकरांची तसेच राज्यातील जनतेची भावना होती, ती आता पूर्णत्वास  आल्याचे रावते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...