आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत मराठा मोर्चा समन्वयकाला भाजपकडून उमेदवारी, आठवले म्हणाले, उपमहापौर रिपाईंचा(महाकौल)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक राजन घाग. - Divya Marathi
मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक राजन घाग.
मुंबई - मुंबईतील मराठा समाजाचा राग शांत करण्यासाठी भाजपने मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबई समन्वयक राजन घाग यांना उमेदवारी दिली आहे. राजन घाग हे वॉर्ड क्रमांक २०५  मधून लढणार आहेत. घाग यांनी मराठा क्रांती मोर्चाची मुंबईमधील बाइक रॅली आयोजित केली होती. याशिवाय अनेक बैठकांचे आयोजनही घाग यांनी केले होते.
 
दुसरीकेड, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि मित्रपक्षांचा जागा वाटपाचा तिढा सुटला असून भाजपने १९२ जागांवर आपले उमदेवार उभे केले आहेत, तर रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला २५, महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला ६ आणि विनायक मेटेंच्या शिवसंग्रामला ४ जागा आहेत. भाजपची सत्ता अाल्यास रिपाइंला उपमहापाैरपद देण्याचे अाश्वासनही देण्यात अाले अाहे.

भाजपने १९२ उमेदवारांची यादी एक दिवस अगोदरच जाहीर केल्याने मित्रपक्षांना ते किती जागा देणार, याविषयी उत्सुकता वाढली होती. अवघ्या ३५ जागांवर तीन मित्रपक्षांना समाधानी करण्याचे आव्हान भाजप नेत्यांसमोर होते. पण, भाजपने आपल्या मित्रपक्षांना समाधानी ठेवण्यात शेवटी यश मिळवले. 
 
मेटेंचे उमेदवार ‘कमळा’वर
शिवसंग्रामच्या खात्यात ३५ पैकी ४ जागा आल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना शिवसंग्रामचे नेते अामदार विनायक मेटे म्हणाले, ‘आम्ही समाधानी आहोत, पण संतुष्ट नाही. शिवसंग्रामकडे निवडणूक चिन्ह नसल्यामुळे त्यांचे चारही उमेदवार भाजपचे िचन्ह असलेल्या कमळावर निवडणूक लढवणार आहेत.’
 
पुढील स्लाइडवर वाचा, सत्ता आल्यास उपमहापौर आमचा..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

 
 
पुढील स्लाइडवर वाचा 
 
बातम्या आणखी आहेत...