आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधी पक्ष नियुक्तीचा मुंबई महापालिकेत पेच, तिसऱ्या क्रमांकाच्या काँग्रेसला पुन्हा संधीची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबई महापालिकेतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या भाजपने सत्तेत सहभागी व्हायचे नाही आणि विरोधी पक्षाची जबाबदारी स्वीकारायची नाही, असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसकडे ही धुरा द्यायची की कसे, असा पेच पालिकेच्या चिटणीस विभागाला पडला आहे.    

गेली २० वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपची युती होती. या वेळी दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. तसेच निवडणुकीनंतर त्यांनी युतीही टाळली. भाजप महापालिकेतील सत्तेत नाही आणि विरोधी पक्षातही नाही. भाजपने या वेळी बाहेरून पाठिंबा देणे पसंत केले. त्यामुळे ३१ संख्याबळ असलेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या काँग्रेसला पुन्हा विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.   गेल्या वेळी काँग्रेसकडेच हे पद हाेते. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ३७ हजार कोटींचा आहे. त्यामुळे विरोधी पक्षालासुद्धा महापालिकेत सत्तेची फळे चाखायला मिळतातच. काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांची या पदावर निवड हाेण्याची शक्यता अाहे.

कायदेशीर सल्लामसलत  
मनपात १४१ वर्षांच्या इतिहासात विरोधी पक्ष नियुक्तीचा असा पेच प्रथमच उद््भवला अाहे.त्यामुळे पालिकेचा चिटणीस विभाग संभ्रमात आहे. १७ मार्च रोजी नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सभा आहे. त्यात विरोधी पक्ष निवडला जाईल. 
बातम्या आणखी आहेत...