आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकांच्या कारभारावर देखरेखीसाठी पहारेकरी; सरकारकडून तीनसदस्यीय समितीची नियुक्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईसह राज्यातील महापालिकांच्या कारभारात पारदर्शकता यावी यासाठी राज्य सरकारने महापालिकेचे नियम, कायदे यांचा अभ्यास करण्यासाठी रामनाथ झा, गौतम चटर्जी आणि शरद काळे या माजी सनदी अधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली आहे. ही समिती तीन महिन्यांत आपला अहवाल सरकारला देणार असून या समितीच्या शिफारशी राज्य सरकार लागू करेल. समितीच्या अध्यक्षपदी मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त शरद काळे यांची निवड करण्यात आली आहे. नगरविकास विभागाकडून याविषयीचा शासन निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला.    

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांवेळी पारदर्शक कारभारावरून भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले होते आणि प्रचाराची सांगता करताना अशा कारभारासाठी तीन जणांची समिती नियुक्त करण्याची घोषणा  मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीमधून माघार घेताना भाजप पहारेकऱ्याचे काम करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.    

समितीमुळे मनमानीला वेसण बसणाार  
मुंबई महानगरपालिकेची सत्ता भाजपच्या हाती आली नसली तरी यापुढे ते शिवसेनेला याआधीसारखा आपल्या मनाप्रमाणे कारभार करून देणार नाहीत हे निश्चित झाले होते. मुंबईकरांच्या हिताच्या आड येणाऱ्या निर्णयाला विरोध केला जाईल, असे स्पष्ट करणाऱ्या भाजपने गेल्या काही दिवसांत मुंबई महापालिकेच्या सभेत काही टेंडरना विरोध करून आपली भूमिका दाखवून दिली होती. समितीचा अहवाल तीन महिन्यांत आल्यानंतर राज्यभर महापालिकांच्या मनमानी कारभारांना वेसण बसणार आहे.
बातम्या आणखी आहेत...