आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियाेजनाचा अभाव, तरीही अाठ तास ड्यूटीचा अट्टहास, लाेकसंख्येच्या तुलनेत मुंबईत पुरेसे पाेलिस कर्मचारी नाहीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 

मुंबई- नव्या वर्षात मुंबई पाेलिसांची ड्यूटी अाठ तासांची करण्याचा निर्णय घेण्यात अाला अाहे. या शहरात सध्या ९३ पाेलिस ठाणी असून दाेन सागरी सुरक्षा पाेलिस स्थानके आहेत. येथील लोकसंख्या लक्षात घेऊन या पाेलिस ठाण्यांतील मनुष्यबळ अत्यंत अपुरे अाहे. त्याशिवाय पाेलिसांसाठी अद्याप अाठ तासांच्या ड्यूटीचे नियाेजनही झालेले नाही. त्यामुळे केवळ अायुक्तांच्या हट्टापायी पाेलिसांची ड्यूटी १२ तासांवरून अाठ तासांवर केल्याचे दाखवले जात अाहे.  

पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी पाेलिसांच्या ड्यूटीचे तास कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र वर्षाच्या पहिल्या दिवशी काेणत्याच ठाण्याला तसा अादेश मिळाला नव्हता. नुसते तोंडी आदेश देत पाेलिसांना ८ तासांची ड्यूटी द्या, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. मात्र तसे केल्यास उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या संख्येत संपूर्ण शहराचे नियाेजन लावणे अशक्य असल्याचे वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांना अायुक्तांच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना कसरत करावी लागेल.
  
मुंबई पाेलिसांवर कामाचा मोठा ताण आहे. वाढती लोकसंख्या, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न,  अति महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, सभा, सण, मोर्चे, आंदोलने, वाहतुकीचा प्रश्न यामुळे आहे. या व्यवस्थेत ८ तासांची ड्यूटी पाेलिसांना लावणे अशक्यप्राय असल्याचे काही अधिकाऱ्यांचे मत अाहे. खरे तर अाज ही ड्यूटी १२ तास कागदाेपत्री असली तरी प्रत्यक्षात त्यांना १५ ते १६ तास काम करावे लागते. काही िदवस तर २४ तासही काम करावे लागते. तसेच सण, सभा, अतिसुरक्षा व्यवस्था बंदोबस्ताकरिताही पोलिसांच्या सुट्याही रद्द केल्या जातात. या पार्श्वभूमीवर देवनार पोलिस ठाण्यातील रवी पाटील नामक एका शिपायाने आयुक्तांना ७३ पानी पत्रही िलहिले होते. या पत्राची दखल घेत पडसलगीकर यांनी मुंबई पोलिसांच्या ड्यूटी तासांमध्ये  बदल करण्याचे ठरवले. यासाठी ते ज्या पाेलिस स्टेशनला भेटीसाठी जातात तेथे ८ तासांच्या ड्यूटीचा आग्रह धरतात. पण तसे शक्य होत नसल्याचे वरिष्ठ पाेलिस िनरीक्षकांचे म्हणणे आहे. 
 
अायुक्तांच्या आदेशानंतर मुंबई पाेलिसांच्या सशस्त्र िवभागातील  कर्मचाऱ्यांची ड्यूटी ८ तास करण्याचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. मात्र हा प्रयोग स्थानिक पाेलिस ठाण्यात यशस्वी होताना िदसत नाही, याचे कारण म्हणजे मनुष्यबळ. लाेकसंख्येच्या तुलनेत एका पाेलिस स्टेशनमध्ये किमान ४० टक्के मनुष्यबळाची कमतरता असल्याचे िदसून आले आहे. त्याचमुळे आहे त्या पाेलिसांवर कामांचा जादा ताण येतो. या ताणामुळे हृदयविकार, मधुमेह, ब्लडप्रेशर, पोटाचे आजार अशा अनके आजारांना अनेक पाेलिसांना सामोरे जावे लागत आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन आठ तासांची ड्यूटीची मागणी केली जात आहे.

मुंबईच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष
मुंबई पाेलिसांच्या आठ तासांच्या ड्यूटीचा प्रयोग यशस्वी झाला तर अमरावती, ठाणे ग्रामीण, ठाणे शहर, कोल्हापूर येथेही पाेलिसांची ड्यूटी आठ तासांची करण्यात िवचार होणार असल्याची माहिती पाेलिस सूत्रांनी िदली. देवनारचे पोलिस िशपाई रवी पाटील यांच्या ७२ पानांच्या पत्रात आहे त्या मनुष्यबळातच पाेलिसांची ड्यूटी ८ तासांची कशी होऊ शकते, याचे िनयोजन िदल्याचे समजते. मात्र तसे िनयोजन करण्याऐवजी अायुक्त पडसलगीकर फक्त तोंडी आदेश देत असल्याची नाराजी काही वरिष्ठ पाेलिस अधिकारी व्यक्त करत अाहेत.    

काही कक्षही बंद करणार   
पाेलिसांच्या ड्यूटीचे तास कमी करण्याबरोबरच मुंबई पोलिसांच्या अखत्यारीतील काही कक्षही कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याचे समजते. यात प्रामुख्याने गुन्हे शाखेचा खंडणीविरोधी कक्ष, मालमत्ता कक्ष, वाहनचोरी विरोधी कक्ष, सोनसाखळी चोरीविरोधी कक्ष, सीआययू विभागाचे लॉजिस्टिक युनिट, तसेच दोन सशस्त्र बल गट िवभागाचा समावेश आहे.

मुंबई- थर्टी फर्स्टच्या रात्री ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या ५६५ वाहनचालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. शनिवारी रात्री शहरात चोख बंदोबस्त होता. रात्री हेल्मेटविना गाडी चालवल्याने २०७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. बेदरकारपणे वाहन चालवल्याप्रकरणी १३ जणांना दंड ठोठावण्यात आला.  रात्री १ वाजल्यापासून सकाळी ८ वाजेपर्यंत पोलिसांनी ही कारवाई केली. या वेळी एकूण ३ लाख ८७ हजार ८०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...