आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताजा महाराष्‍ट्र - मुंबईत रेल्‍वे पार्किंगला दुचाकी ठेवता, मोजा 50 रूपये !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - तुम्‍हाला आता जर रेल्वे स्थानकाच्‍या पार्किंगमध्‍ये दुचाकी पार्क करायची असेल तर, त्‍यासाठी चक्‍क 50 रूपये मोजावे लागणार आहेत. मुंबईतील मध्य रेल्वेच्या स्थानकांबाहेर दुचाकीसाठी तब्बल 50 रुपये शुल्‍क आकारण्‍यात येऊ शकते, अशी सुत्रांची माहिती आहे.
रेल्‍वे स्‍थानकाबाहेर पार्किंगचे नियोजन करण्‍यासाठी कंत्राटदार नेमण्‍यात येतात. मात्र सध्‍या असलेला 20 रूपये दर कंत्राटदारांना परवडत नसल्‍याने त्‍यांनी तक्रारी केल्‍या आहेत. त्यामुळे रेल्वे आता पार्किंगसाठी नव्याने निविदा काढण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यामध्‍ये नवीन दरवाढ ही 50 रूपये केली जाण्‍याची शक्‍यता आहे.
प्रवासी संघटनांनी केला निषेध
रेल्‍वेची भूमिका ही कंत्राटदारांच्‍या बाजूने असल्‍याने प्रवासी संघटनांनी निषेध केला आहे. मुंबईच्‍या अनेक उपनगरांमधून दिवसाला लाखो लोक मुंबईच्‍या दिशेने प्रवास करतात. बहुतेक प्रवासी रेल्‍वेस्‍थानकावर दुचाकीने येतात. पार्किंगमध्‍ये दुचाकी ठेऊन रेल्‍वेने मुंबईकडे निघताता. त्‍यामुळे रेल्‍वेस्‍थानकात पार्क होणा-या हजारो दुचाकींना या पार्किंग शुल्‍काच्‍या वाढीचा फटका बसणार शकतो.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर.., ठाणेकरांच्‍या पाण्याच्या करात 20 ते 30 टक्क्यांनी दरवाढ.., ट्रकच्‍या धडकेत दोन पादचारी ठार..,इंद्राणी मुखर्जीला 31 ऑक्‍टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी..