आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणूक : शिवसेनेत असंतुष्ट वाढले, अंबोले भाजपत; नाशकात मनसेची पहिली यादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नाशिक - महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने गुरुवारी मुंबईत राजकीय हालचालींना वेग आला. शिवसेनेने बुधवारी रात्री मुंबईतील विभागप्रमुखांकडे एबी फॉर्म सुपूर्द केले. मात्र तिकिटवाटपावरून मोठी नाराजी झाल्याचे पाहायला मिळाले. नगरसेवक नाना अंबोले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर माजी महापौर शुभा राऊळ यांनी एबी फॉर्म घेतला नाही. निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र भाजपात जाणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दुसरीकडे नाशिकने मनसेच्या उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी सायंकाळी जाहीर केले. या पहिल्या यादीत 54 जणांची नावे आहेत. 
 
महापौर स्नेहल आंबेकर यांना नको असलेल्या वॉर्ड क्रमांक 195 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, नगरसेविका किशोरी पेडणेकर,शितल म्हात्रे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर यांना एबी फॉर्म दिले.
 
शुभा राऊळ म्हणाल्या, पक्षासाठी काम करत राहणार
माजी महापौर आणि शिवसेना नेत्या शुभा राऊळ भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. बुधवारी रात्री त्यांना देण्यात आलेला एबी फॉर्मही त्यांनी स्वीकारला नाही. मात्र निवडणूक लढवणार नसले तरी शिवसेनेत पक्षासाठी काम करत राहणार असल्याचे शुभा राऊळ यांनी स्पष्ट केले आहे. 
 
वडाळ्यात सैनिकांचेच शाखेला कुलूप 
वडाळा येथील वॉर्ड क्रमांक 178 मधून आदित्य ठाकरे यांनी त्यांचे नीकटवर्तीय अमेय घोले यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज शिवसैनिकांनी वडाळा येथील शाखेला कुलूप लावून आपली नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक शिवसैनिकांनी याठिकाणी माधुरी मांजरेकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. 

शिवसेनेने यांना दिले एबी फॉर्म 
प्रभाग क्रमांक 4 - सुजता पाटेकर 
प्रभाग क्रमांक 5 - संजय घाडी 
प्रभाग क्रमांक 7 - शीतल म्हात्रे 
प्रभाग क्रमांक 11 - रिद्धी खूरसुंगे 
प्रभाग क्रमांक 14 - भरती कदम 
प्रभाग क्रमांक 18 - संध्या दोशी 
प्रभाग क्रमांक 191- विशाखा राऊत
प्रभाग क्रमांक 194 - समाधान सरवणकर
प्रभाग क्रमांक 179 - तृष्णा विश्वासराव
प्रभाग क्रमांक 175 - मंगेश सातमकर
प्रभाग क्रमांक 196 - आशिष चेंबूरकर
प्रभाग क्रमांक 193 - हेमांगी वरळीकर
प्रभाग क्रमांक 199 - किशोरी पेडणेकर
प्रभाग क्रमांक 195 - स्नेहल आंबेकर
प्रभाग क्रमांक 203 - इंदू मसूलकर
प्रभाग क्रमांक 123 - भारती बावदाने
प्रभाग क्रमांक 124 - शामली तळेकर
प्रभाग क्रमांक 125 - रूपाली सुरेश आवळे
प्रभाग क्रमांक 126 - सुधाकर पाटील
प्रभाग क्रमांक 133 - सचिन गायकवाड
प्रभाग क्रमांक 134 - वर्षा मोहिते
प्रभाग क्रमांक 135 - समिक्षा सक्रे
प्रभाग क्रमांक 136 - शबनम शेख
प्रभाग क्रमांक 137 - संध्या आंबेकर
प्रभाग क्रमांक 138 - सुनंदा शिंदे
प्रभाग क्रमांक 139 - सुरेश पाटील
प्रभाग क्रमांक 140 - रंजना नरवड
प्रभाग क्रमांक 141 - हेमंत साळवी      
 
भाजपची घराणेशाही..
पारदर्शकतेच्या मुद्द्यावर शिवसेनेला घेरणाऱ्या भाजपच्या मुंबई महानगर पालिका उमेदवारांच्या यादीतील काही नावे समोर आली आहेत. विशेष म्हणजे, खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याला वॉर्ड क्रमांक 108 मधून उमेदवारी मिळाल्याचे समोर आले आहे. तसेच आमदार राज पुरोहित यांच्या मुलालाही उमेदवारी मिळाली आहे. मंत्री विद्या ठाकूर यांचा मुलगाही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजपमध्येही घराणेशाही असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.                 

भाजपची यादी लीक?
निवडणुकीच्या तोंडावर असंतुष्टांची बंडखोरी रोखण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची नावे जाहीर न करण्याची भूमिका भाजपने घेतली होती. पण तरीही भाजपने तयार केलेली यादी लीक झाल्याने भाजप कार्यकर्त्यांपर्यंत काही उमेदवारांची नावे पोहोचली आहेत. त्यामुळे भाजपलाही आता बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, नागपुरात फडणवीस, गडकरी यांची बैठक..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...