मुंबई - महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने मित्रपक्षांबरोबर महायुती झाल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मुंबई महानगर पालिका निवडणुकीत भाजप, आरपीआय, रासप, शिवसंग्राम एकत्रितपण निवडणुका लढणार आहेत.
भाजप महायुतीचे जागावाटप
भाजप - 192
आरपीआय - 25
रासप - 6
शिवसंग्राम - 4
दरम्यान महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस असल्याने मोठ्याप्रमाणावर गोंधळ पाहायला मिळत आहे. शिवसेनेला मोठ्या प्रमाणावर बंडखोरीचा सामना करावा लागत असल्याचे समोर येत होते. पण शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांचा सर्संवाधिक संताप पाहायला मिळाला. नाशिकमध्ये तिकिट वाटपानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष पाहायला मिळाला. तर अमरावतीमध्ये काॅंग्रेसचे शहराध्यक्ष संजय अकर्ते यांना काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. एबी फार्म वाटपाच्या वेळी त्यांच्यात वाद झाला होता.
उमेदवारी न मिळाल्याने भाजपच्या राज इच्छुकांनी ठाणे आणि नाशिकमधील भाजप कार्यालयात राडा घातला. तसेच नागपुरात उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर नाराज इच्छुकांनी गडकरी वाड्याबाहेर घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली.
काय घडले शुक्रवारी..
> सोलापूर - भाजपचे सरचिटणीस हेमंत पिंगळे यांना अटक, पोलिसांशी वाद प्रकरण
> नाशिक - शिवसेना कार्यकर्त्यांचा वाढता गोंधळ पाहून पोलिसांनी मध्यस्थी केली अन्यथा मोठा गैरप्रकार घडण्याची शक्यता होती.
> नाशिक - शिवसेनेच्या एबी फॉर्म वाटपाच्यावेळी प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला.
> नाशिकमध्ये पैसे घेऊन तिकिट वाटल्याचा आरोप भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी केला.
> नाशिकमध्ये सर्वच पक्षांतील नाराजांचा राडा
> भाजपने रिपाईंला 20 जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, रिपाईने जास्त जागा मागितल्याची चर्चा.
> विनोद तावडे यांच्या घरी रिपाईंचे रामदास आठवले यांच्याबरोबर जागावाटपाबाबत बैठक 12 वाजता सुरू.
> शुक्रवारी सकाळीच प्रभादेवी येथील वॉर्ड क्रमांक महेश सावंत यांनी तिकिट न मिळाल्याने बंडखोरी करत अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला.
> ठाण्यातील शिवसेनेच्या नगरसेविका स्नेहा पाटील राष्ट्रवादीत. वॉर्ड क्रमांक 3 ची उमेदवारी.
> सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनीता कारंडे भाजपामध्ये.
राष्ट्रवादीच्या उमेदवार खड्डे भरत जाणार अर्ज दाखल करायला
प्रभाग क्रमांक 202 च्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सौ.उमा सुनील भास्करन मुंबईतील सर्व समस्या मांडत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार आहेत. अतिशय अनोख्या पध्दतीनं मुंबईच्या समस्या दाखवत आणि हेच करून दाखवलं या घोषणा दिल्या जाणार.अर्ज भरण्यासाठी जाताना त्या अशाप्रकारे समस्या मांडतील..
- जाताना डांबर भरून खड्डे बुजवत जाणार..
- सलाईन घेऊन सोबत रुग्ण असणार..
- गळ्याला पट्टा लावलेले मुंबईकर..
- कचऱ्यामुळे त्रस्त मुंबईकर मास्क लावून..
अनेक ठिकाणी नावेच जाहीर नाहीत
पुण्यात जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी अजूनही अमेदवारी याद्या जाहीर केलेल्या नाहीत. बंडखोरी रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून अनेक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले मात्र उमेदवारांची नावे जाहीर करणे टाळले आहे. नाशिकमध्येही मनसे वगळता एकाही पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अमरावती काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना झालेल्या मारहाणीचे PHOTO
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)