आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर : 60 वर्षीय वृद्धाची ठेचून हत्या, शनिवारी रात्री उशीरा प्रकार घडल्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - वर्धा मार्गावर असलेल्या मनीष नगर येथील झोपडपट्टीत एका व्यक्तीला दगडाने ठेचून मारल्याची घटना समोर आली आहे. विटांनी ठेचून या व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे. मृताचे नाव जगन हरिश्चंद्र यादव (वय60) आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघड झाली. जगन गेल्या काही वर्षांपासून झोपडीत एकटा राहात होता. त्याची हत्या कोणी आणि कशासाठी केली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. जगनच्या मुलानेच त्याची ओळख पटवली असल्याची माहिती सोनेगाव पोलिसांनी दिली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...