आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांची मर्जी सांभाळण्यासाठी नारायण राणेंना भाजपमध्ये \'नो एन्ट्री\', पक्षाध्यक्षांचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माजी मुख्यमंत्री नारायण राणे अापल्या वाढदिवशी म्हणजे १० एप्रिल राेजी कणकवलीत अायाेजित कार्यक्रमातून भाजपत प्रवेश करणार असल्याची जाेरदार चर्चा हाेती. मात्र साेमवारी असा काहीच प्रकार घडला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणेंच्या भाजप प्रवेशाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अनुकूल असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र राजी नाहीत. त्यामुळे फडणवीसांना नाराज करून राणेंना भाजपत देण्यास भाजपाध्यक्ष अमित शहा तयार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

महाराष्ट्रात शिवसेनेशी दोन हात करण्यासाठी राणेंचा उपयोग तर होईलच; पण कोकणात भाजपची ताकद वाढेल, असे सांगून राणेंच्या पक्षप्रवेशाचे महत्त्व भाजपमधील काही नेत्यांनीच अमित शहांना पटवून देण्याचा प्रयत्न केला हाेता. परंतु मुख्यमंत्री फडणवीस हे मात्र राणेंना भाजपत घेण्यास फारसे उत्सुक नाहीत.  एक तर राणे यांची ताकद सिंधुदुर्ग  जिल्ह्यापुरती मर्यादित आहे, तसेच त्यांना पक्षात घेतल्यास महत्त्वाचे मंत्रिपद द्यावे लागेल. तसे न झाल्यास राणे स्वस्थ बसणार नाहीत अाणि भाजपलाही अडचणीत आणतील, अशी भीती फडणवीसांनी शहांकडे व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हा मुद्दा शहांना न पटल्याचेही सांगितले जाते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व नारायण राणे यांच्यामधून िवस्तवही जात नाही.  अशातच राणेंना भाजपत घेतल्यास शिवसेना-भाजपत तणाव अजून वाढेल व सरकार अस्थिर हाेण्याची भीतीही मुख्यमंत्र्यांना वाटत अाहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्र्यांना नाराज करण्यापेक्षा राणेंना दूर ठेवलेलेच बरे, असा विचार भाजप नेतृत्वाकडून केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...